पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. १९ : फेसबुक अकाउंट वरून फ्रॉड कॉल करून खंडणी मागणाऱ्या आरोपीना वारजे माळवाडी पोलिसांकडून तात्काळ अटक करण्यात आली आहे.
अधिक माहिती अशी की मनीषा या नावाच्या महिलेचे फेसबुक अकाउंट वापरून मनीषा असल्याचे भासवत आरोपींनी फिर्यादी यांना फेसबुक कॉल करून स्वर्णा हॉटेल, वारजे माळवाडी येथे बोलावले. फिर्यादी तेथे गेल्यानंतर तेथे हजर असलेल्या तीन इसमांनी संघनमत करून फिर्यादी यांना सायबर पोलीस असल्याची बतावणी करून फिर्यादी हे मुलींना ट्रॅप करतो, त्यांचे व्हिडिओ काढतो अशी तक्रार करत असल्याची धमकी देऊन, तक्रार न करण्यासाठी ५० हजार रुपयाची खंडणी मागितली व ती एटीएम मधून काढून देण्यास भाग पाडले. खिशातील 3 हजार पाचशे रू. जबरदस्तीने काढून घेतले. त्याबाबत फिर्यादी यांनी वारजे माळवाडी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवली आहे. गुन्हेगारांवर भादवि कलम ३९२, ३८४, ४२०,१७०,५०६,३४ अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.
गुन्हाचा तपास करत असताना एक आरोपी पुन्हा स्वर्णा हॉटेल येथे आल्याची बातमी मिळाल्यानंतर त्याला लगेच ताब्यात घेण्यात आले. त्याची विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव अक्षय राजेंद्र जाधव (वय 28 वर्ष राहणार कर्वेनगर पुणे) व अन्य दोन आरोपी यांची माहिती शिवाजी गोविंदराव सांगोले (वय 34 वर्ष रा. नऱ्हे पुणे) भरत बबन मारणे (वय 45 रा. रामनगर वारजे पुणे) या तीनही आरोपींना अटक करून, 24 तासात गुन्हा उघडकीस आणला आहे. पुढील तपास सहा पोलीस निरीक्षक ए बी ओलेकर वारजे माळवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर हे करीत आहे.
सदरची कामगीरी ही अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री प्रविणकुमार पाटील पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-३ सुहेल शर्मा सहा. पोलीस आयुक्त, कोथरुड विभाग, भिमराव टेळे यांच्या मार्गदर्शनाखाली वारजे माळवाडी पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल जैतापुरकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय कुलकर्णी यानी तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर पार्वे, पोलीस अंमलदार अमोल राऊत, अमोल सुतकर, बंटी मोरे श्रीकांत भांगरे, अजय कामठे, राहुल हंडाळ यांनी केलेली आहे.












