पुणे : खडकी परिसरातील स्वयंघोषित भाई व त्याच्या दोन साथीदारांविरोधात पोलिसांनी मोक्का कायदा अंतर्गत कारवाई केली आहे. ३० जून रोजी बोपोडी येथील रहिवासी असणारे फिर्यादी हे बाजारात जात असताना बोपोडी येथील छाजेड पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी थांबले होते. त्यांच्या मागून येऊन आरोपींनी रांगेची लाईन तोडली. फिर्यादी यांनी जाब विचारला असता त्यांच्या गाडीला धक्का देत आरोपींनी धक्काबुक्की करत मारहाण केली होती. तसेच स्वतःला या एरियाचा भाई सांगत फिर्यादी यांच्या डोक्यावर धारधार शस्त्राने वार केले व उपस्थित लोकांना दमदाटी केली होती. त्याबाबत फिर्यादी यांनी खडकी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली होती.
गणेश विष्णु अडागळे उर्फ सुंद्री गण्या (वय २० वर्षे, दापोडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्या दोन विधीसंघर्षीत साथीदारांना ताब्यात घेण्यात आले आहे. यातील टोळीप्रमुख हा येरवडा कारागृह येथे असुन, यातील दोन विधीसंघर्षीत बालके यांना सुधारगृहात ठेवण्यात आले आहे.
सदर आरोपीविरोधात भा.द.वि. कलम ३०७,३२३,५०४,५०६,३४, आर्म अॅक्ट कलम ४ (२५) महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ ( १ ) सह १३५, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट कलम ०७ अन्वये दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा सन १९९९ चे कलम ३ (१) (ii) ३ (२) ३(४) चा अंतर्भाव करण्याची श्री. रंजनकुमार शर्मा मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, यांनी मान्यता दिली आहे.
मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. रितेश कुमार यांनी कार्यभार घेतल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली मकोका अंतर्गत केलेली ही ३७ वी कारवाई आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री. रंजनकुमार शर्मा, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ४ श्री. शशिकांत बोराटे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, खडकी विभाग, पुणे शहर, श्रीमती आरती बनसोडे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र सहाणे, खडकी पोलीस स्टेशन पुणे शहर, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. मानसिंग पाटील, पोलीस उप-निरीक्षक, श्री. अण्णा गुंजाळ, पोलीस उप निरीक्षक श्री. संतोष भांडवलकर, सर्वेलन्स पथकाचे पोलीस अंमलदार राजकिरण पवार व रमेश जाधव यांनी केली आहे.
स्वयंघोषित भाईला मोक्काचा दणका : आयुक्त रितेश कुमार यांची ३७ वी कारवाई












