स्वातंत्र्य काळापासून एनडीए रोडवरील देशमुख वाडी, शिवणे या ठिकाणी एकही बसस्टॉप शेड नव्हते.आम् आदमी पार्टी चे निलेश वांजळे यांनी PMPML कडे सतत केलेल्या पाठपुराव्यामुळे पहिले बसस्टॉप शेड देशमुखवाडी,शिवणे या ठिकाणी बसवण्यात आले आहे.
31 जुलै 2023 स. 11वा. या बस स्टॉप चे लोकार्पण व उद्घाटन PMPML चे जेष्ठ प्रवासी उमाकांत जाधव, सा.कार्यकर्ते ज्ञानोबा शिंदे, पत्रकार सलीम शेख, आप प्रवासी आघाडीचे सेंथील अय्यर, आपचे निलेश वांजळे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बाबासाहेब जाधव, प्रशांत शिंदे, अमोल मोरे, सुरेखाताई भोसले, मुमताज शेख, अक्षय शिंदे, ज्ञानेश्वर बिबवे,प्रकाश शिंदे,अभिजित वाघमारे,पवन जाधव,एलिस मार्टिन,अंजना वांजळे,ऋषिकेश मारणे,ओमकार वाघमारे,संदेश सोळेकर,प्रकाश शिंदे,विमल वांजळे,समिना शेख व इतर नागरिक उपस्थित होते.
स्वातंत्र्यानंतर प्रथमच देशमुख वाडी शिवणे येथे बसला बसस्टॉप.












