यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस)च्या वतीने राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा
युवकांमध्ये देशाची स्वातंत्र्य चळवळ व राष्ट्रीय एकत्मतेविषयी
जनजागृती व्हावी आणि ही एकात्मता आणखी दृढ करण्यासाठी युवकांनी प्रयत्नशील व्हावे असे मत
यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) चे संचालक डॉ.शिवाजी मुंढे यांनी व्यक्त केले. चिंचवड येथील संस्थेच्या कॅम्पस मध्ये आयोजित राष्ट्रीय एकता दिवसाच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.यावेळी त्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला अभिवादन
केले व आपल्या मनोगतात सरदार पटेल यांच्या जीवनकार्याविषयी माहिती देत त्यांच्या जीवनातून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यायला हवी असे सांगितले. सरदार पटेल यांनी स्वातंत्र्यानंतर भारताच्या एकीकरणात मोलाची भूमिका बजावली आणि राष्ट्रीय
एकता दिवस हा त्यांच्या दूरदृष्टीचा आणि देशासाठी दिलेल्या योगदानाचे स्मरण आहे असे त्यांनी नमूद केले.सशक्त भारताच्या निर्मितीसाठी राष्ट्रीय एकात्मतेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे असे
डॉ. मुंढे यावेळी म्हणाले. सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या राष्ट्रीय एकता दिनानिमित्त संस्थेचे संचालक डॉ. शिवाजी मुंढे यांनी उपस्थित सर्वांना राष्ट्रीय एकात्मतेची सामूहिक शपथ दिली. या कार्यक्रमाला संस्थेचे सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.












