पिंपरी(प्रतिनिधी) लायन्स क्लब ऑफ़ निगडीच्या वतीने एमजेएफ 2D कै. हरिदास नायर यांच्या 76 व्या जयंती निमित्त वृक्षारोपण,जीवनाश्यक वस्तूंचे वाटप,गीतगायन असे विविध उपक्रम राबविण्यात आले. सकाळच्या दरम्यान पर्यावरण डिस्ट्रिक्ट कॅबिनेट आॅफिसर सलिम शिकलगार यांच्या पुढाकाराने तंगमणी हरिदास नायर यांच्या हस्ते मल्लिकार्जुन मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले .या वृक्षारोपण कार्यक्रमाचे संयोजन माजी नगरसेवक आर एस कुमार यांनी केले, संजय निंबाळकर व क्लबच्या अध्यक्षा मिनांजली मोहीते यांनी सर्वांचे स्वागत करीत कै. हरिदास नायर यांच्या गत स्मृतींना उजाळा दिला.
या प्रसंगी डिस्ट्रिक्ट कॅबिनेट आॅफिसर लायन दामाजी असबे ,झोन चेअरपर्सन लायन शिरीष हिवाळे,महापालिका उद्यानाचे श्री गायकवाड, राजू काळभोर, प्रमोद पवार यांच्या हस्तेही वृक्षारोपण करण्यात आले.लायन्स क्लब निगडी चे बहुसंख्य सभासद हजर होते.या प्रसंगी जयश्री व जयंंत मांडे, डाॅ दिलीपसिंह मोहीते, एमजेएफ लायन हर्ष नायर,नसिम शिकलगार, ला. देविदास ढमे, चंन्द्रशेखर व भाग्यश्री पवार,लायन प्रमोद व मनिषा गायकवाड, राजीव कुटे, प्रविण शेलार, अजितकुमार देशपांडे व दुर्गाशंकर बेहरा या सर्व सभासदांनी ही वृक्षारोपण केले.ला. सलिम शिकलगार म्हणाले कि, कै हरिदास नायर यांच्या स्मरणार्थ दरवर्षी 14 सप्टेंबरला वृक्षारोपण हा कायमस्वरूपी उपक्रम राबविण्यात येईल .
सकाळी निगडी क्लबच्या वतीने सभागृहात अकरा गरजू महिलांना जिवनावश्यक
अन्नधान्य कीटचे वाटप करण्यात आले.ही हा उपक्रम चंन्द्रशेखर व भाग्यश्री पवार यांच्या तर्फे आयोजित करण्यात आला होता.
क्लब अध्यक्ष मिनांजली मोहीते यांनी सर्वांचे स्वागत करीत स्व. हरिदास नायर यांच्या 76 व्या वाढदिवसानिमित्त ,त्यांना स्मरून ,ते कायम आठवणीत राहतील. असे सांगितले.नंतर ल तंगमणी नायर ,एमजेएफ ला. हर्ष नायर यांच्या हस्ते महिलांना अन्नधान्य वाटप करण्यात आले. नंतर माजी अध्यक्ष देविदास ढमे,एमजेएफ सुदाम मोरे, नसीम शिकलगार,
शिवकन्या मुसमाडे , रश्मी नायर ,लायन प्रशांत कुलकर्णी दुर्गाशंकर बेहरा व प्रमोद व मनिषा गायकवाड या सर्वांच्या हस्ते अन्नधान्य वाटप करण्यात आले. हा उपक्रम दरवर्षी स्व.हरिदास नायर यांच्या स्मरणार्थ कायम स्वरूपी राबवण्यात येईल .
नंतर सकाळी आकुर्डी येथील मौनीबाबा आश्रमात अन्नदान व स्मृतीगंध हा गायनाचा कार्यक्रम हर्ष नायर व प्रशांत कुलकर्णी यांनी आयोजीत केला होता.लायन्स क्लब इनोव्हेशन बरोबर हा उपक्रम केला गेला.सुरूवातीला इनोव्हेशन क्लब चे अध्यक्ष लायन संदिप पोकलम यांनी सर्वांचे स्वागत केले व लायन हरिदास नायर यांच्या बद्दल च्या आपल्या भावना व्यक्त केल्या.नंतर निगडी क्लब अध्यक्ष मिनांजली मोहीते यांनी स्वर्गीय एमजेएफ 2 D
लायन हरिदास नायर यांचे आदरणीय व्यक्तीमत्व कसे होते,त्यांनी आम्हांला वेळोवेळी मार्गदर्शन केले,या सर्व आठवणी त्यांच्या 76 व्या वाढदिवसा निमीत्त सांगितल्या,
नंतर इनोव्हेशन क्लबचे सभासद विनायक घोरपडे यांनी त्यांचे गायक सहकारी रश्मी कांकरीया व प्रती मुकेश आवाज असणारे सुशिल यांच्या बरोबर स्मृतीगंध कार्यक्रमास बहारदार सुरूवात केली.आश्रमांतील राहणारे लोकांसमवेत गाणी सादर केली.या कार्यक्रमास
एमजेएफ लायन दिलीपसिंह मोहीते, लायन जयश्री व लायन जयंत मांडे,लायन चंन्द्रशेखर व लायन भाग्यश्री पवार, लायन सलिम व लायन नसीम शिकलगार, लायन प्रशांत कुलकर्णी, लायन प्रविण शेलार,लायन प्रमोद व लायन मनिषा गायकवाड, तंगमणी नायर, रश्मी नायर , शिवकन्या मुसमाडे व दुर्गाशंकर बेहरा हजर होते,तसेच लायन्स क्लब इनोव्हेशन चे ही मान्यवर सभासद उपस्थित होते.












