आष्टी: हंबर्डे महाविद्यालयाच्या वतीने माजी विद्यार्थी स्नेहमिलन मेळाव्याचे शनिवार (दि 19) रोजी आयोजन करण्यात आले आहे. हा स्नेहमिलन कार्यक्रम सकाळी १० वाजता हंबर्डे शैक्षणिक संकुलन आष्टी येथे आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्याच्या प्रमुख अतिथी आष्टी तालुक्याच्या नगराध्यक्षा श्रीमती आयशा इनायतुल्ला बेग असून कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी किशोर हंबर्डे आहेत. माजी विद्यार्थी मेळावा उद्घाटन विधान परिषदेचे सदस्य, सुरेश धस यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी विधानसभा सदस्य आष्टी, बाळासाहेब आजबे तसेच माजी प्राचार्य बलभीम महाविद्यालय वसंत सानप हे उपस्थित राहणार आहे.
या मेळाव्या चे आयोजन हे माजी विद्यार्थ्यांची भेट, चर्चा आणि भावनिक सलोखा टिकवण्यासाठी करण्यात येणार आहे. येथे मान्यवरांचे विचार, तसेच विद्यार्थ्यांकडून त्यांचे मनोगत व्यक्त करण्यात येणार आहे.
हंबर्डे महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन












