
आष्टी: हंबर्डे महाविद्यालयाच्या वतीने माजी विद्यार्थी स्नेहमिलन मेळाव्याचे शनिवार (दि 19) रोजी आयोजन करण्यात आले होते. हा स्नेहमिलन कार्यक्रम सकाळी १० वाजता हंबर्डे शैक्षणिक संकुलन आष्टी येथे आयोजित करण्यात आला होता.
ॲड. बी. डी. हंबर्डे महाविद्यालयाला पन्नास वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी किशोर हंबर्डे होते तर माजी विद्यार्थी मेळाव्याचे उद्घाटन विधानसभा सदस्य आष्टी, बाळासाहेब आजबे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी विधान परिषदेचे सदस्य, बीड – धाराशिव – लातूर सुरेश धस उपस्थित होते. तसेच माजी प्राचार्य बलभीम महाविद्यालय वसंत सानप, मा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मराठवाड्यातील दूत म्हणून संबोधले जाणारे इंदोरचे उद्योजक परमेश्वर येवले देखील उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी तसेच अध्यक्ष किशोर हंबर्डे यांनी मा. परमेश्वर येवले यांचे महाविद्यालयाला न्यायिक परवाना मिळवून दिल्याबद्दल विशेष आभार मानले व त्यांचा सत्कार देखील यावेळी करण्यात आला.

आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाने पन्नास वर्षांपूर्वी सुरू केलेले ॲड. बी. डी. हंबर्डे महाविद्यालय वेगाने प्रगती करत आहे, तसेच या महाविद्यालयाच्या माध्यमातून अनेक शेतकरी पुत्रांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचे महत्वपूर्ण काम होत आहे, असे प्रतिपादन यावेळी विधान परिषदेचे सदस्य, बीड – धाराशिव – लातूर सुरेश धस यांच्याकडून करण्यात आले.
या मेळाव्याचे आयोजन हे माजी विद्यार्थ्यांची भेट, चर्चा आणि भावनिक सलोखा टिकवण्यासाठी करण्यात आला होता.
दैनिक राज्य लोकतंत्रच्या संघटक विचारणे तसेच लोकतंत्रच्या संपूर्ण परिवारातर्फे ॲड. बी. डी. हंबर्डे महाविद्यालयाला पन्नास वर्ष पूर्ण झाली या बद्दल खास शुभेच्छा.












