दौंड: आम्ही भिमाचे सेवानिवृत्त कामगार असुन गेली आठ वर्षे आम्ही आमची देणी द्यावित.यासाठी भिमाचे अध्यक्ष आणि तालुक्याचे आमदार राहुल कुल यांचेकडे विनवण्या करत आलो आहोत.
देणी मागणें हा गुन्हा आहे काय ? असा हताश सवाल उपस्थीत करुन गुन्हा असेल तर कुल यांनी आमचेवर कारवाई करुन आम्हा सेवानिवृत्त कामगारांना कायमचे तुरुंगात टाकावे.. अशी अतिशय विमनस्क अवस्थेत कामगारांनी प्रातिनिधिक स्वरूपात पत्रकार यांचेशी बोलताना मागणी केली आहे.
सेवानिवृत्त कामगार आज आठ वर्ष कुटुंबाला एकही रुपयांचा अर्थीक उत्पन्न बंद झाल्याने प्रपंच चालवणे अवघड झाले आहे. एक एक दिवस काढणे कठीण जात आहे. कोणी कोणाला मदत करणेही दुरापास्त झाले आहे.
तरीही देणी मिळतील अशी आशा बाळगून दिवस मोजत आहोत. आज विस दिवस झालेत उपोषण सुरु करुन कुल दखल घेण्याची जाणिव पुर्वक टाळण्याचा प्रयत्न करीत आहेत.
महसुल , पोलिस, कामगार आयुक्तालय, जिल्हाधिकारी, प्रांत आणि तहसिलदार जिल्हा समाचार पत्र, यांनी मानवतेच्या दृष्टीकोनातून आमच्याकडे लक्ष देण्याचं जाणीव पुर्वक टाळलेले आहे. आमच्यावर होत असलेला अमानुष अन्यायाची दाद घेण्यास कोणीही तयार नाही.
यापेक्षा अध्यक्ष आमदार राहुल कुल यांचे शासना सह सर्वच यंत्रणेत प्रचंड वजन आहे. त्यांनी आपले राजकीय वजन वापरून आम्हा सेवानिवृत्त कामगार यांचे विरोधात अनाजी पंत निती वापरुन साम, दाम, दंड, भेद आणि षड्यंत्र वापरुन आम्हास आणी आमच्या बायका मुलांन सह कायम स्वरुपी तुरुंगात टाकावे. देणी देता येत नाहीत. मात्र हे त्यांना सहज सत्तेच्या जोरावर करता येईल. आणि ते करुन आपली जबाबदारी बेताल, तिताल आणि बेमुरवतखोर पणे एकदाची पार पाडावी.
विशेष म्हणजे शासन व्यवस्थेत असल्याने सत्तेच्या माध्यमातून पैसा आणि पैशाच्या जोरावर पुन्हा सत्ता, भिमाचया भ्रष्टाचारामुळे मिळालेले कोट्यावधी रुपये यामुळे मस्त वाल झाल्याने कुल यांना जनतेचे घेणे देणे राहीलेले नाही. कामगारांना तर ते कवडीची किंमत देत नाहीत. त्यांच्या या वागण्याची तालुक्यात सर्व दुर प्रचंड दबाव दहशत आणि भययुक्त दादागिरी आहे. यामुळे याबाबत कोणीही बोलण्याच टाळत आहेत. यामुळे कुल प्रचंड अडचणीत आले आहेत, त्यांचे विरोधात नाराजी पसरली असुन असंतोषाचे खदखदत आहे. आणि यांचं कारणाने कुल यांचा सुपडा साफ होईल. असे उद्वेगाने सेवानिवृत्त कामगार प्रातिनिधिक स्वरूपात मत व्यक्त करीत आहेत.