पुणे प्रतिनिधी
पुणे दि.३ : वारजे माळवाडी परिसरात येथे पूर्व वैमनस्यातून एका तरुणावर बंदुकीतून गोळ्या झाडल्याची घटना समोर आली होती. ही घटना दि.१७ जुलै रोजी जयभवानी चौक, रामनगर येथे घडली होती. या प्रकरणी दहशत माजविणाऱ्या टोळी प्रमुखासह चार साथीदारांवर मकोका कारवाई करण्यात आली आहे.(टोळी प्रमुख) ओंकार ऊर्फ टेड्या उमेश सातपुते (वय २३ रा.संघर्ष चौक, वारजे माळवाडी),वीर फकिरा युवराज कांबळे(वय २२ .रासरडे बाग,शिवणे),३ विधीसंघर्षित बालके असे कारवाई करण्यात आलेल्या आरोपीचे नावे आहे. वीर फकिरा युवराज कांबळे हा फरार असून विधीसंघर्षित बालकांना पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची ४२ वी मकोका कारवाई आहे. पोलिसांच्या तपासा मध्ये टोळी प्रमुख नव्याने टोळी तयार करत असल्याची माहिती समोर आली आहे. शस्र जवळ बाळगणे, खुनाचा प्रयत्न करणे, गंभीर दुखापत, जीवे ठार मारण्याची धमकी देणे, सदर घटनेत फिर्यादी हे घराच्या समोर क्रिकेट खेळात असताना आरोपींनी फिर्यादीस जवळ बोलावून शिवीगाळ करत आज तुला आम्ही खल्लासच करतो अशी धमकी देऊन जवळील बंदुकीतून फिर्यादीच्या दिशेने गोळ्या झाडल्याने परिसरातील लोक सैरावैरा पळू लागले. झाडलेली गोळी फिर्यादीच्या कमरेच्या उजव्या बाजूस घासून जमिनीवर लागली व जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
आरोपी विरोधात भा.द.वी.कलाम ३०७,३४ आर्म ऍक्ट कलम ३(२५), मपो.अधि.कलाम ३७(१)सह १३५ क्रिमिनल लॉ.अ.मे.का.कलाम ७ अंतर्गत वारजे माळवाडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सह पोलीस आयुक्त कोथरूड विभाग भीमराव टेळे करीत आहेत.
सदरची कामगिरी पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार,पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त प्रवीण कुमार पाटील, पोलीस उपायुक्त परि-३ सुहेल शर्मा, यांच्या मार्गदर्शनाखाली वारजे माळवाडी पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जैतापूरकर,पोलीस निरीक्षक अजय कुलकर्णी,पोलीस उप निरीक्षक विशाल भिडे, पथकाकडील पोलीस अमलदार संभाजी दराड,विजय खिलारी,नितीन कातुर्डे यांनी केले आहे.
हत्यार बाळगणाऱ्या टोळीवर मकोका












