पिंपरी (प्रतिनिधी) : हल्लीच्या पिढीला ओणमसारखे सण उत्सव साजरे करण्यात स्वारस्य नाही आणि त्यांना केरळ सोडण्यातच रस आहे. तिथे राहायचे नाही, केरळची संस्कृती आणि इतिहास जाणून घेण्यास ते उत्सुक नाहीत. हे चित्र बदलले पाहिजे आणि नव्या पिढीला आपली कला,परंपरा,संस्कृतीची माहिती मिळाल्यास केरळच्या विकासाला चालना मिळेल.
असे उदगार केरळ राज्याचे अन्न आयोगाचे अध्यक्ष तथा माजी सनदी अधिकारी के.व्ही. मोहनकुमार यांनी काढले.
आकुर्डी येथील चिंचवड मल्याळी समाज (सीएमएस) आयोजित ओणम कार्यक्रमात
के व्ही मोहन कुमार यांना सीएमएस राजहंसम पुरस्कार प्रदान करण्यात आला.पुरस्कार स्वीकारल्यानंतर ते बोलत होते.
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे संस्थापक सदस्य एन विनोदचंद्र मेनन, सीएमएसचे अध्यक्ष टी. पी. विजयन, सरचिटणीस सुधीर सी. नायर, कोषाध्यक्ष पी. अजयकुमार, पी. श्रीनिवासन, पी. सी. विजयकुमार, पी. व्ही. भास्करन, महिला विभाग प्रमुख प्रविजा विनीत, फॅंसी नायर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी एन. विनोदचंद्र मेनन म्हणाले कि,
केरळबाहेरील मल्याळी लोक उत्तम काम करत आहेत. सीएमएस उत्तम कार्य करीत आहे. सीएमएसने केलेला ओणम उत्सव प्रशंसनीय आहे. पूकलम (फुलांची रांगोळी) स्पर्धेचे बक्षीस , दहावी बारावी तील १५ विद्यार्थ्यांचा सत्कार, ज्येष्ठ नागरीकांचा सत्कार आणि सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले.
फुकलम स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या संघाने स्त्रीभ्रूण हत्या तर द्वितीय संघाने चांद्रयान-३ ची प्रतिकृती, आणि केरळचे प्रतीक काढून एक संदेश फुलांच्या रांगोळीतून दिला.
पारितोषिक विजेते पुढीलप्रमाणे आहेत : प्रथम पारितोषिक संघ – श्रीजेश गंगाधरन, सरिता ज्योतिदिनराज, वंदना राजेंद्रन, सिनी अनूप, प्रवीजा विनीत.
द्वितीय विजेता संघ : निशा सनीलकुमार, सिंधू नायर, श्रीलता ब्रिजेश, मंजू रवींद्रन, शामिनी श्रीकुमार.
तृतीय विजेता संघ : आतिश पिल्ले , पुष्पा पिल्ले, स्मिता जयकृष्णन, अभिरामी नायर, अक्षरा पिल्ले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक टीपी विजयन यांनी तर स्वागत सुधीर नायर यांनी केले. सूत्रसंचालन लता विनोद मेनॉन
तर आभार प्रदर्शन पी. अजयकुमार यांनी मानले.












