पुणे प्रतिनिधी
पुणे दि. ११ : लोणी काळभोर परिसरात गावठी हातभट्टी दारू विकणाऱ्या महिले विरोधात स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. सरस्वती संतोष राठोड (वय ३६ रा. काळेशिवार, शिंदवणे ता. हवेली) असे कारवाई करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची ४१ वी स्थानबद्धतेची कारवाई आहे.
सदर आरोपी महिला तीन साथीदारांसह लोणी काळभोर परिसरात गावठी हातभट्टी दारू तयार करणे व विक्री करणे या सारखे गंभीर गुन्हे केले आहे. आरोपी विरोधात मागील पाच वर्षांमध्ये चार गुन्हे दाखल आहेत. सदर परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास व जीवितास धोका निर्माण झाला होता.
सदर आरोपी विरोधात पोलीस आयुक्तांनी एम.पी.डी.ए कायद्यान्वये एक वर्षा करिता कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह येथे स्थानबद्ध करण्यात आले आहे. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण व ए.टी. खोबरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पी.सी.बी. गुन्हे शाखा यांनी पार पडली आहे.












