पिंपरी चिंचवड प्रतिनिधी
शिरगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत पवना नदीच्या कडेला असलेल्या अरगडे यांच्या शेतात हातभट्टी बनविण्यात येत असल्याची तक्रार शिरगाव येथील निखिल प्रफुल पाटील यांनी दि. २१ रोजी शिरगाव पोलीस स्टेशन मध्ये केली. त्या अनुषंगाने शिरगाव पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने सदर ठिकाणी जाऊन छापा टाकला असता त्यांना हातभट्टी तयार करण्यासाठी जमिनीत दोन खड्डे करून त्यात ६००० लि. गुळ मिश्रित रसायन भिजत घातल्याचे आढळून आले.
पोलीसांनी कारवाई करत एकूण ४,८०,००० रु किमतीचा माल नष्ट केला आहे. पोलिसांची चाहूल लागताच हातभट्टी मालक प्रज्योत ईश्वर राजपूत वय १९ रा. कांजारभाट वस्ती शिरगाव हा तेथून पसार झाला.
पोलीसांनी प्रज्योतच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम ३५(क)(फ) गुन्हा दाखल केला आहे. सदरची कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक वनिता धुमाळ यांच्या मार्गदर्शनखाली शिरगाव पोलीस तपास पथकाने केली.












