पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. २५ : कार चालकाने धडक देऊन दुचाकी वरील इसमाचा हात फ्रॅक्चर झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना देहू रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे.
याप्रकरणी राजेंद्र वाल्मीक मोरे ( वय २१, रा. टेल्को कॉलनी, वडगाव मावळ ) यांनी अज्ञात चार चाकी चालकाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
यादी व त्यांचा मित्र त्यांच्या इलेक्ट्रिक दुचाकी वरून किवळे ब्रिज जवळ, लेखाफर्म साईडने वळणावर मुकाई चौकाकडे येत होते. त्यावेळी एका अज्ञात चार चाकी चालकाने त्यांच्या इलेक्ट्रिक दुचाकीला धडक देऊन त्यांचा डावा पाय फ्रॅक्चर होण्यास आणि तोंडातील तीन दात पडण्यास जबाबदार झाला आहे.
आरोपीवर भादवी कलम २७९,३३७,३३८, मो. वा. का. १८४ अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून अद्याप आरोपीला अटक करण्यात आली नाही.सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस फौजदार बनसोडे हे करत आहेत.












