ग्वालियर येथे दि. ११,१२,१३ ऑक्टोबर रोजी आयोजित राष्ट्रीय सी.बी.एस.ई. एरोबिक्स स्पर्धेत हेवन जिमनॅस्टिक अकॅडमीच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत २ सुवर्ण व १ रौप्य पदकांची कमाई केली. या स्पर्धेत अकॅडमीच्या तीन खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
९ ते ११ वर्षे वयोगटातील एकेरी महिला गटात राही फुलतांबकर हिने सुवर्ण पदक पटकावले, तर
१२ ते १४ वर्षे वयोगटातील एकेरी महिला गटात सानवी पाटिल हिने सुवर्ण पदक मिळवले आणि धानी पटेल हिने रौप्य पदक प्राप्त केले. स्पर्धेत हेवन जिमनॅस्टिक अकॅडमीचे प्रमुख श्री. हर्षद कुलकर्णी यांनी प्रशिक्षक म्हणून उत्कृष्ट मार्गदर्शन केले, तर सौ. उर्वशी पटेल यांनी व्यवस्थापकाची भूमिका निभावली. सर्व खेळाडूंना मान्यवर, प्रशिक्षक आणि पालकांनी त्यांच्या यशाबद्दल शुभेच्छा दिल्या.हेवन जिमनॅस्टिक अकॅडमीचे श्री. चैतन्य कुलकर्णी यांनी या यशाची माहिती दिली.