बीड/प्रतिनिधी
दि.२९. चौसाळा पोलीस चौकी जवळ असलेल्या जानकी हॉटेल बियर बार लॉजिंग मध्ये गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने शुक्रवार दि. 28जूलै रोजी रात्री पर्दाफाश केला. यावेळी पोलिसांनी वेश्याव्यवसाय करणाऱ्या तीन महिलांची सुटका केली.
धुळे सोलापूर महामार्गावरून चौसाळाकडे जाताना पोलीस चौकी पासून काही अंतरावर दशरथ तानाजी थोरात याच्या मालकीचे जानकी हॉटेल बिअर बार व लॉजिंग आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या ठिकाणी नकली दारू सोबतच वेश्याव्यवसाय राजरोस सुरू होता. याबाबतची गुप्त माहिती पंकज कुमावत यांना मिळाली या माहिती आधारे त्या ठिकाणी ग्राहक पाठवून शहानिशा करण्यात आली. त्यानंतर शुक्रवारी रात्री 7.30 वा. सुमारास धाड टाकली. यावेळी हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावर काही ग्राहकांसह वेश्याव्यवसाय करत असलेल्या महिला पोलिसांच्या हाती सापडल्या. पोलिसांनी केलेल्या या कारवाईत तीन महिलांची सुटका करण्यात आली तर दशरथ तानाजी थोरात रा. चौसाळा ता. जी. बीड,दिनेश प्रल्हाद सोनवणे रा. चौसाळा ता.जि. बीड, गणेश मच्छिंद्र लहाने रा. महाकाळ
ता. अंबड जि.जालना या तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून नेकनूर पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायदा 1956 अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान ही कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, अंबाजोगाई, अप्पर पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत पीआय पवार, पोह अतिश देशमुख, राजू वंजारे, गित्ते, प्रभा ढगे, संतराम थापडे, गणेश नवले, पोका तुकाराम कानतोडे यांनी केली.












