पुणे | प्रतिनिधी
पुणे दि.२९ : कर्नाटकाहून पुण्यामध्ये विक्रीसाठी आणलेल्या ४ हजार ९७० किलो बनवट पनीरचा साठा कात्रज चौकातून जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई (दि.५) रोजी दरोडा व वाहन विरोधी पथक -१ आणि अन्न व औषध प्रशासन यांनी संयुक्तरित्या केली आहे.
नॅशनल ॲग्रीकल्चरल अँड फूड अनोलेसीस अँड रिसर्च इन्स्टिटयूड, बाणेर येथे बनावट पनीरचा काही भाग तपासणीसाठी लॅबला पाठवण्यात आले होता. सदर पॅकेट मधील पनीर भेसळयुक्त व मानवी शरीरास घातक असल्याचे लॅबच्या अहवालात म्हंटले आहे.
या बाबत अधिक माहिती अशी कि कर्नाटकाहून पुण्यामध्ये विक्रीसाठी पनीर आणून पुणे शहरातील छोटे-मोठे दुकान व हॉटेलात दिले जाणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या वाहन व दरोडा विरोधी पथक एकला मिळाली. त्या अनुषंगाने पोलीस व अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी क्रांती बावरकर यांनी सापळा रचून सदर टेम्पो ताब्यात घेतला.
१० लाख रुपये किंमतीचा बनावट पनीरचा साठा जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे,पोलीस उप आयुक्त अमोल झेंडे,सह.पोलीस आयुक्त सुनील तांबे, यांच्या मार्गदर्शना खाली दरोडा व वाहन विरोधी पथक -१ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर,सह. पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील,पोलीस उप निरीक्षक शाहिद शेख,पोलीस अंमलदार सुनील ताकपेरे,महेश पाटील यांच्या पथकाने केले आहे.
१० लाखाचा बनावट पनीरचा साठा जप्त; पोलिसांची कामगिरी












