आळंदी : देशातील १३५ कोटी जनतेचे भवितव्य ठरवणारी ही निवडणूक आहे. राज्यातील आपल्या भागातील प्रश्न सोडवण्याची ही निवडणूक आहे, असे अजित पवार म्हणाले. काल ( दि.९ रोजी ) आळंदी येथे शिरूर लोकसभा मतदार संघ महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजीत पवार यांची सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, देहू, आळंदी हा परिसर तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज पदस्पर्शाने पावन झाला आहे. येथून लाखो वारकरी पंढरीला दिंड्या घेऊन जातात. ही परंपरा वर्षानुवर्षे चालत आलेली आहे. आपण आळंदी येतो माऊलींचे दर्शन घेतो, नतमस्तक होतो. एक चांगला विचार माउलींनी तुकारामांनी समाजासमोर मांडला. अनेक साधू संतांनी तो विचार मांडला व पुढे नेण्याचे काम केले. वारकरी संप्रदाय त्याचे पाठराखण करतात याचा आम्हाला समाधान आहे.
केंद्र सरकार यांनी देहू पंढरपूर, आळंदी पंढरपूर हा पालखी मार्ग आहे. तो कधी भव्य,त्यामध्ये सुविधा ,विसावा मुक्काम त्यांच्या मदतीने आता देतोय.आपण झाडे लावणार आहोत.सामाजिक संघटनेने यात सहभाग घ्यावा.भविष्यात वारकरी संप्रदायाला सावली त्या पासून भेटणार आहे.
महायुती सरकार मध्ये आम्ही काम करत आहे. त्यात मुख्यमंत्रीव उपमुख्यमंत्री असे काम करत आहोंत. खेडचे शिल्पकार म्हणून दिलीप मोहिते यांचे नाव घेतो.
विशेष प्रयत्नातून निधीतून त्यांनी 56 कोटींची विकास कामे आळंदी देवाची या परिसरात केली आहे. अजूनही काही कामे राहिली असली तरी माझी व दिलीपरावांची तयारी आहे. इंद्रायणी प्रदूषण थांबवले पाहिजे. या संदर्भातील इंद्रायणी सेवा फौंडेशनच्या निवेदनाबाबत अजित पवारांनी यावेळी माहिती दिली.
निष्ठावान विरुद्ध गद्यार अशा पध्दतीने या निवडणुकीकडे पाहिली पाहिजे – राजेश टोपे
तसेच ते पुढे म्हणाले , आचार संहिता संपल्यावर दिलीप मोहिते व महायुती चे प्रमुख पुणे येथे येऊन येथील प्रश्नांची आठवण करून द्यावी ते मार्गी लावता येतील. अमोल कोल्हे यांवर टीका करताना अजित पवार म्हणाले मागच्या काळात अमोल कोल्हे यांना निवडून दिले.कोल्हे यांनी ५ वर्षात जो संपर्क शिरूर ,खेड मतदारसंघात ठेवायला पाहिजे होता.तश्या पध्दतीने त्यांनी ठेवला नाही. ते म्हणायचे मला राजीनामा द्यायचा आहे. हे नको आहे मला असह्य झाले आहे. मी सिलेब्रिटी आहे, अभिनेता आहे. मी त्या ठिकाणी नाटककार आहे. कलाकार आहे. माझे हे काम नाही.मला माझ्या केलेला महत्व द्यायचे आहे. मला माझ्या चित्रपटांच्या भूमिकेला महत्व द्यायचे आहे. शूटिंगला महत्व द्यायचे आहे.ज्या मालिका चालल्या आहेत त्याला महत्त्व द्यायचे आहे, असा आग्रह त्यांनी माझ्याकडे धरला. ते बैठकीत हजर राहत नव्हते. शिफारस पत्र देत नव्हते. भागात आले नाही, विचारपूस केली नाही.तर मग जनता जाब विचारते. तीन वेळेला खासदार होते त्यांना आता महायुतीने घडयाळचे चिन्ह देऊन उभं केलं आहे. घड्याळाचे बटन दाबून शिवाजी आढळराव यांना बहुमूल्य मत द्यावं अशी विनंती करण्यासाठी येथे मी आलो आहे.
तसेच अजित पवार म्हणाले, केंद्राचा आम्हाला मोठा निधी आणायचा आहे. येथे वारकरी देशातून राज्यातून येतात.परदेशी लोक भाविक या दिंडीत सहभागी होतात.त्यामुळे या सुविधा मिळाल्या पाहिजेत.राज्य सरकार देत आहे त्याला केंद्रांची जोड मिळाली तर आपल्याला अधिक फायदा होणार आहे. अनेक विकासाचे प्रश्न व अडचणी मार्गी लावता येणार आहेत. गेली ५ वर्षात कोल्हे यांनी केवळ भाषण केली त्यातून काही निष्पन्न झाले नाही.आपल्याला भाषण करणारा माणूस नको आहे. भाषणे ही केली पाहिजे व लोकसभेच्या स्तरावर असलेल्या अडी अडचणी सोडवल्या पाहिजे. यासाठी आढळराव यांना निवडून दिले पाहिजे. हे पुन्हा सत्तेवर आले तर संविधान बदलतील ,घटना बदलतील ,निवडणुका पुन्हा होणार नाहीत. असे होणे शक्य नाही. काम करताना छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतो. स्व.यशवंतराव चव्हाण यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतो.शिव शाहू आंबेडकर यांची भूमिका त्या रस्त्याने चालतो.जे कोणी सांगत असेल संविधान ,घटना बदलतील ते खोट आहे.इंदिरा गांधींनी यांनी आणीबाणी आणली जनतेने इंदिरा गांधी सकट सर्व पक्ष पराभूत केला.एवढी जबरदस्त ताकद डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानात आहे. आळंदी पाणी प्रश्न संदर्भात ते म्हणाले , पाण्याचे प्रश्न आहेत ते येथे मांडण्यात आले. वास्तविक आपल्या येथे धरणं उशाशी आहे .आपण मात्र उपाशी राहिलो आहे. भामा आसखेड चे पाणी माझ्या पिंपरी चिंचवड गेले.माझ्या पुणे शहराला गेले.तो सर्वांचा हक्क आहे.मात्र माझ्या आळंदीकरांच काय? त्यांनाही पिण्यासाठी पाणी मिळाले पाहिजे.
तसेच ते पुढे म्हणाले , मी महायुतीमध्ये गेलो. फार मोठी चूक केली नाही. फार विचार पुर्वक निर्णय आम्ही घेतला आहे. कारण स्वर्गीय चव्हाण साहेबांनी सांगितले होते सत्ता तुमच्या कडे असेल तर बहुजन समाजाचे,मागासवर्गीय समाजाचे, आदिवासी समाजाचे अल्पसंख्याक ,ओबीसी चे प्रश्न तुम्ही सोडवू शकता.सत्ता नसेल तर तुम्हाला फक्त आंदोलन करावी लागतील.मोर्चे काढावे लागतील.उपोषण करावे लागेल. त्यातून फारसे साध्य होईल असा भाग नाही.म्हणून आम्ही महाराष्ट्रातील वेगवेगळ्या विधान सभा मतदारसंघातील विकासाची कामे करण्या करता सगळेजण सत्तेत सहभागी झालो आहोत.
आम्हाला कोणाचा अपमान करायचा नाही.पवार साहेबांना सांगितले होते आपले वय ८४ झाले आहे. कुठ तरी माणसाने थांबले पाहिजे. आपल्या समोरच्या व जवळच्या माणसाला आशीर्वाद देण्याचे काम , त्याला कुठे चुकले तर कान धरण्याचे काम करायला पाहिजे. ते मला म्हणाले, अजित मी राजीनामा देतो व पुन्हा दोन तीन दिवसांनी मागे घेतला. आम्हाला ही काही कळलं नाही. वयाप्रमाणे उत्साह कमी होतो. ४०, ५०, ६०, ७०, ८० वर्षांचे वय याबाबत विविध उदाहरणे यावेळी त्यांनी दिली. तब्येत ,आरोग्य चांगले हवे यातून समाजाला जे देता येईल ते देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुम्ही भावनिक होऊ नका.आम्ही कोणाचाही अपमान केला नाही. यावेळी महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.