पुणे प्रतिनिधी
पुणे दि.१५ : रेल्वे प्रवासा दरम्यान नागरिकांचे मोबाईल चोरी किंवा गहाळ होण्याच्या घटना घडत असतात. अशा घटनेत चोरीस गेलेले ४५ मोबाईल पुणे रेल्वे पोलिसांनी स्वातंत्र्य दिनाचे अवचित्त साधून मोबाईल धारकांना यावेळी परत देण्यात आले आहे.
या सोबतच पोलीस दलातील ३३ पोलीस अंमलदार ते सह पोलीस उप निरीक्षक पदा पर्यंतच्या व १३ पोलीस अमलदारांना पोलीस नाईक ते पोलीस हवालदार पर्यंत अशा एकूण ४६ पोलीस अमलदारांना शासनाकडून पदोन्नती देण्यात आली आहे.
तसेच रेल्वे पोलिसांकडून शालेय विद्यार्थ्यांसाठी आधुनिक शस्त्र प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तज्ञ व्यक्तींकडून शस्त्रांच्या विविध भागांची व कार्याविषयाची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. प्रदर्शन मध्ये ५.५६ इन्सास रायफल, ९ mm कार्बाईन मशीन, AK -४७,ग्लॉक पिस्टल, MP- ५, ७.६२ mm SLR,१२ बोअर,गॅसगन या सारख्या आधुनिक शस्त्रांचा समावेश होता.
ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सुभेदार चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेते अजय पुरकर उपस्थित होते. व उपस्थित सर्वाना फळं वाटण्यात आले. जीआरपी पोलिसांतर्फे सोसायटी ऑफ फ्रेंड्स ऑफ द ससून हॉस्पिटल पुणे या संस्थेत जाऊन तेथील मुलां बरोबर ध्वजारोहण करण्यात आले व मुलांना फळं वाटण्यात आले आहे.
चोरीस गेलेले व गहाळ झालेले मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी रेल्वे पोलिसांचे कौतुक करून आभार व्यक्त केले आहे. प्रदर्शनस भेट देण्यास आलेल्या विध्यार्थी व शिक्षकांनी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, पोलीस उप अधीक्षक चंद्रकांत भोसले, उप विभागीय अधिकारी देवीकर व इतर अधिकारी आणि पोलीस अमलदारांचे आभार मानले आहेत.












