पुणे प्रतिनिधी
पुणे दि.१६ : पुणे जिल्ह्या मध्ये उद्या दि. १७ ऑगस्ट पासून तलाठी परीक्षांना सुरुवात होत आहे. ही परीक्षा दि.१७ ऑगस्ट २०२३ ते १४ सप्टेंबर २०२३ दरम्यान होणार आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस मार्फत शहरात ११ केंद्रावर परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेची वेळ सकाळी ९ ते ११ आहे. दि. २३,२४,२५,व ३० ऑगस्ट २०२३ ते दि. २,३,७,९,११ व १२ सप्टेंबर पर्यंतच्या तारखा वगळण्यात आले आहे.
तलाठी परीक्षे दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पुणे पोलिसांकडून विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. सर्व परीक्षा केंद्राच्या परिसरात दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करण्यात आले आहे.
तसेच परीक्षा केंद्रावर मोबाईल,वायरलेस सेट, कॅल्क्युलेटर, इलेकट्रोनिक डिवाइस व इतर संपर्क साधने जवळ बाळगण्यास व १०० मीटर परिसरात वापरण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे. सदरच्या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती विरोधात कलम १८८ अंतर्गत कारवाई करण्यात येईल.












