पुणे प्रतिनिधी
पुणे दि.२७ : एका महिन्यात दामदुपटीने पैसे परत मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका इसमाची फसवणूक केल्या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. आनंद नारायण पावसकर (वय ३६ रा. तिरुपतीनगर, वारजे नाका,मु.पो.डाळिंब ता.दौंड,जि.पुणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
आरोपी हा सदर ठिकाणीच असल्याची बातमी तपास पथकातील पोलीस अंमलदार अमोल पाटील,देवा चव्हाण, शेगडे यांना मिळाली. त्या अनुषंगाने पोलिसांनी शनिवार (दि.२२) रोजी आरोपीला अटक करण्यात आली. आरोपी कडून गुन्ह्यातील नऊ लाख ३० हजार रुपये किंमतीचे १९ तोळे सोने जप्त करण्यात आले आहे.
सदर घटनेत फिर्यादी यांनी एप्रिल २०२२ मध्ये एका वृत्तपत्रात आलेल्या जाहिरातीवरील मोबाईल क्रमांकावर संपर्क केले होता. त्यावेळी आरोपीने विश्वास संपादन करून प्लॉटिंग मध्ये पैसे गुंतवा आणि एका महिन्यात पैसे दुप्पट मिळवून देतो असे सांगितले.आरोपीने फिर्यादीकडे सोन्याची मागणी करून त्यावर कर्ज काढून पैसे गुंतवण्याचा बहाण्याने जवळपास १९ तोळे सोने लंपास केले. व आरोपी वर्षभर फिर्यादी यांना गुंगारा देत होता. या प्रकरणी आनंद पावसकर व प्रथमेश पावसकर यांच्या विरोधात सिंहगड पोलीस स्थानकात भा.द.वि. कलाम ४२०,४०६,३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सिंहगड पोलीस करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस उप आयुक्त सुहेल शर्मा, सह. पोलीस आयुक्त राजेंद्र लांडगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन,पोलीस निरीक्षकजयंत राजूरकर, यांच्या मार्गदर्शन खाली सह. पोलीस निरीक्षक सचिन निकम,मोकाशी,पोलीस उप निरीक्षक आबा उतेकर,अंमलदार संजय शिंदे, देवा चव्हाण, अमोल पाटील,विकास बांदल,विकास पांडुळे,सागर शेडगे,अविनाश कोंडे,राहुल ओलेकर,शिवाजी क्षिरसागर,दक्ष पाटील,नलीन येरुणकर, स्वप्नील मगर, यांच्या पथकाने केली आहे.
१९ तोळे सोन्याची फसवणूक करणाऱ्या आरोपीला ठोकल्या बेड्या












