पुणे : किरकोळ वादातून दोन गटात झालेल्या हाणामारीत टोळक्याने तरुणाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील वानवडी येथील सय्यद नगर येथे गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. ऐन गर्दीच्या वेळी घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. यामध्ये दोन जण जखमी झाले आहेत. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
अजीम शेख उर्फ अंत्या (३५) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १६ ऑगस्ट रोजी रेहान खान उर्फ नन्नू हा भाजी घेण्यासाठी गल्ली क्रमांक २१ मध्ये गेला होता. येथे एकमेकांकडे पाहण्यावरून आमिर खान आणि रेहान खान मध्ये वाद रंगला. त्यावरून आमिर खानने त्याच्या मित्रांना फोन केला, तर रेहानने अल्ताफ वजीर शेखला फोन केला. त्यानंतर रात्री साडेदहा वाजता गल्ली क्रमांक १९ मध्ये त्यांच्यात मारामारी झाली.
हा वाद मिटवण्यासाठी गुरुवारी (दि. १७) रात्री साडेआठच्या सुमारास सादिक वेल्डर याने वजीर शेख व इतरांना गल्ली क्रमांक ३, गुलाम अली नगर येथील आपल्या गॅरेजमध्ये बोलावून घेतले. मात्र, यावेळी पुन्हा मतभेद वाढले. त्यानंतर टोळक्यांमध्ये हाणामारी झाली. यामध्ये अजीम शेख या तरुणाचा मृत्यू झाला. तर दोन जण जखमी झाले आहेत.
दरम्यान, मंगळवारी पहाटे एक वाजण्याच्या सुमारास शिवाजीनगर येथील मंगला टॉकीजजवळ एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. त्याच्यावर 10 ते 12 जणांच्या टोळक्याने हल्ला केला. या घटनेनंतर अवघ्या 24 तासांत आणखी एका खुनाची घटना घडली आहे. वानवडी परिसरात गजबजलेल्या ठिकाणी अजीम शेखची हत्या करण्यात आली. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. गर्दीच्या ठिकाणी तरुणांची हत्या होत असल्याने पुणेकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
२४ तासांत आणखी एक खून; गजबजलेल्या रस्त्यावर एका तरुणाची निर्घृण हत्या
Silhouette of man hand holding weapon indoors. Closeup unknown criminal attacking with knife in spotlight background. Unrecognizable male arm stabbing with dagger in dark. Crime concept.












