पुणे प्रतिनिधी
पुणे दि.२ : पहाटेच्या सुमारास घरामध्ये चोरी करणाऱ्या चोरट्याला येरवडा पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आले आहे. सिद्धेश मुकेश शेंगे (वय १८ रा. लक्ष्मीनगर,येरवडा) व एका विधिसंघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
सदर आरोपी हा पर्णकुटी, येरवडा येथे येणार असल्याची माहिती तपास पथकातील पोलीस अंमलदार अमजद शेख व अनिल शिंदे यांना मिळाली. सदर आरोपींनी येरवडा भागात (दि.३१) ऑगस्ट रोजी पहाटेच्या वेळी घरातील नागरिक झोपलेले असताना दरवाजाची कडी काढून घरातील मोबाईल, रोख रक्कम, बॅंन्टक्सचे नेकलेस चोरी करून फरार झाले होते. तपास पथकाला माहिती मिळताच त्या अनुषंगाने पोलिसांनी कारवाई केली आहे.
सदर आरोपींनी चोरीचा गुन्हा काबुल केला असून ६ हजार ३५० रुपये किंमतीचा मुद्दे माल जप्त करण्यात आला आहे. आरोपी विरोधात भा.द.वि कलम ४५४,३८० अंतगत येरवडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरचे कामगिरी पोलीस उपायुक्त परिमंडळ ४ शशिकांत बोराटे, सह पोलीस आयुक्त येरवडा विभाग संजय पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम, पोलीस निरीक्षक कांचन जाधव, पोलीस निरीक्षक जयदीप गायकवाड, यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाच्या अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अंकुश डोंबाळे, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप सुर्वे, पोलीस अंमलदार गणपत थिकोळे, दत्ता शिंदे, तुषार खराडे, मिलिंद निढाळकर, किरण घुटे, अमजद शेख, सागर जगदाळे, खाटमोडे, अनिल शिंदे, राहुल परदेशी, सुरज ओंबासे , दत्तात्रय शिंदे, प्रशांत कांबळे, सुशांत भोसले यांनी केले आहे.












