पुणे प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड दि.२९ : पुणे नाशिक हायवे लगत असलेल्या एम आर सूर्या इलेक्ट्रॉनिक इंडिया कंपनीच्या गोडाऊन मध्ये २५ लाखाचे एलईडी टीव्ही चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना दि. २२ जुलैच्या रात्री घडली आहे. या प्रकरणी गोविंदराम माळी यांनी म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे.
आरोपी आजीज पाशा शेख (वय ६० रा.टाकळी,ता. खुलताबाद,जि.संभाजीनगर) हा फरारआहे. कबीर बुढन पठाण वय ३४ रा.आष्टी ता.परतून जि.जालना, मूळचा ता.गंगापूर, जि.औरंगाबाद याला अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हा कबुल केला असून चोरीस गेलेला २० लाख रुपये किमतीचे कोडॅक व हायर कंपनीचे ६१ एलईडी टीव्ही व ६ लाख रुपये किंमतीचा टेम्पोत जप्त करण्यात आला आहे.
सदर घटनेत पोलिसांनी घटना स्थळापासून ते सुपे टोलनका पर्यंत एकूण ४५ सीसीटीव्ही फुटेज तपासात टाटा कंपनीच्या टेम्पोत चोरीचा माल घेऊन फरार होतं असल्याचे स्पष्ट झाले. त्या अनुषंगाने पोलिसांनी कारवाई केली आहे. या प्रकरणी आरोपीं विरोधात भा.द.वि.कलाम ४६१,३८०,३४ अंतर्गत म्हाळुंगे पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पूर्वी ही आरोपी कबीर पठाणवर ३ आळंदी,२ वाळुंज (संभाजीनगर), १ अंबड (जालना),असे एकूण सहा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल आहे. पुढील तपास म्हाळुंगे पोलीस करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चोबे, सहाय्यक पोलीस आयुक्त संजय शिंदे, आपण पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस आयुक्त विवेक पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्रसिंग गौर, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंतराव बाबर, पोलीस उपनिरीक्षक विलास गोसावी, पोलीस हवलदार राजू कोणकेरी, अमोल बोराटे, युवराज बिराजदार, संतोष होळकर, संतोष काळे, किशोर सांगळे, विठ्ठल वाडेकर, गणेश गायकवाड, राहुल मिसाळ, अमोल माटे, बाळकृष्ण पाटोळे, शरद खैरे, विजय पिंपळे यांनी केले आहे.












