२६ जुन हा जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणुन विविध देशामध्ये साजरा केला जातो. त्याअनुषंगाने मा. श्री. रितेशकुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी पुणे शहरातील विविध शाळा, कॉलेज येथील विद्यार्थ्यांना तसेच झोपडपट्टी रहाणारे रहिवाशांना “चला संकल्प करुया.. अंमली पदार्थापासुन दुर राहुया..” या संकल्पनेवर अभियान राबवुन जनजागृती सुचना दिलेल्या होत्या.

जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाच्या पार्श्वभुमीवर पुणे शहर पोलीसांकडुन “ ध्यास – नशामुक्तीचा” हे अभियान राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने सोमवारी (दि. २६) रोजी पुणे शहर पोलीस आयुक्तालयात सदर अभियानाचा मा. श्री. रितेशकुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर यांचे हस्ते दिपप्रज्वलन करुन शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी महाराष्ट्रीय मंडळाचे कटारिया हायस्कुल दामले प्रशाला चंद्रशेखर आगाशे शारिरीक शिक्षण महाविद्यालयाचे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची “चला संकल्प करुया.. अंमली पदार्थापासुन दुर राहुया..” या संकल्पनेवर जागर दिंडी व पथनाटयाव्दारे पोलीस आयुक्त कार्यालयापासुन, किराड चौक, ब्ल्यु नाईल चौक, इस्कॉन मंदिरापासुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, एम. जी. रोड अशा प्रकारे कॅम्प परिसरातुन रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये ठिकठिकाणी पथनाटयाव्दारे व्यसनमुक्तीबाबतचे सादरीकरण करुन जनजागृती केली आहे. तसेच जागर दिंडीव्दारे देखील चुकीच्या संगतीमुळे मुला-मुलींमध्ये केली जाणारी नशा रोखण्याकरिता व व्यसनांपासुन दुर रहाणेबाबतचे बॅनर्स, पोस्टर्स व स्पिकरव्दारे आवाहन करण्यात आलेले आहे. यापुढेही पुणे शहरात विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करुन हे अभियान राबविण्यात येणार आहे.

सदरच्या कार्यक्रमाचेवेळी मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री रितेशकुमार मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. रामनाथ पोकळे, मा. अपर पोलीस आयुक्त, प्रशासन श्री. अरविंद चावरिया, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री. अमोल झेंडे, मा. सहा पोलीस आयुक्त, गुन्हे १. श्री. सुनिल पवार, मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे २. श्री. सतिश गोवेकर, अंमली पदार्थ विरोधी पथकाचे श्री. विनायक गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. सुनिल थोपटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच “महाराष्ट्रीय मंडळाचे” कटारिया हायस्कुल दामले प्रशाला चंद्रशेखर आगाशे शारिरीक शिक्षण महाविद्यालयाचे शालेय व महाविद्यालयाचे एकुण ३५० विद्यार्थी, संस्थेच्या संचालिका मुख्याध्यापक, शिक्षक तसेच १०० नवप्रविष्ठ पोलीस अमंलदार व अंमली विरोधी पथकातील सर्व अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.












