पुणे पोर्शे कार अपघातातील अल्पवयीन आरोपीच्या ब्लड सॅम्पलच्या अदला-बदली प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे. तीन सदस्यीय कमिटीने मंगळवारी ससून जनरल हॉस्पिटलला भेट दिली. आता या प्रकरणात नवीन अपडेट समोर आली आहे.
चौकशी दरम्यान समजले की, आरोपीचे ब्लड सॅम्पल घेण्यापूर्वी डॉ. अजय तवारे आणि आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांच्यात व्हॉट्सअप आणि फेसटाईमवर चौदा कॉल आणि एक साधा कॉल झाला होता. हे फोन कॉल सकाळी ८:३० ते १०:४० च्या दरम्यान करण्यात आले होते आणि सकाळी ११ वाजता ब्लड सॅम्पल घेण्यात आले होते.
पोलिसांनी १९ मे रोजी झालेले अपघाताच्या दुसऱ्या दिवशी आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलल्याचे संकेत दिले होते. खाजगी रुग्णालयात डीएनएसाठी घेतलेले ब्लड सॅम्पल आणि ससूनमधील ब्लड सॅम्पल न जुळल्याने हे प्रकरण उघड झाले होते.
यानंतर ससून हॉस्पिटलच्या फॉरेन्सिक मेडिसिन डिपार्टमेंटचे प्रमुख डॉ. अजय तवारे,
मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हळनोर आणि कर्मचारी अतुल घाटकांबळे यांना अटक करण्यात आली होती. या तिघांवर आरोप आहे की, त्यांनी लाच घेऊन आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलले होते, जेणेकरून कार चालक अल्पवयीन आरोपीने दारू प्यायली असल्याचे उघड होणार नाही. आरोपीचे वडील आणि डॉ. तावरे यांच्यात कोण मध्यस्थी करत होता? याचाही तपास केला जात आहे, असे पोलिसांनी सांगितले.