पुणे प्रतिनिधी
पुणे, दि. २२ : त्रिवेणीनगर येथील सेंट ॲन्स स्कूल ट्रस्ट यांच्या वतीने तसेच वाय.एम.सी. पुणे यांच्या सहकार्याने घेण्यात आलेल्या
३१ व्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपद चॅम्पियन ॲक्वेटीक क्लबने पटकावले.
या स्पर्धेचा बक्षीस समारंभ वाय.एम.सी. पुण्याचे सचिव प्रवीण मॅकेनझी, सेंट ॲन्स स्कूलचे अध्यक्ष सी जे फ्रांसीस, सचिव ॲनी फ्रान्सीस, प्राचार्या क्लारा दास यांच्या हस्ते पार पडला. तसेच यावेळी स्पर्धेत उत्कृष्ट खेळाडू म्हणून अनुष्का विजापूरे व सत्यजित मोहिते यांना प्रत्येकी रु.३००० /-रोख रक्कम देण्यात आली. पुढील ३ मुले व ३ मुली यांना वर्षभरासाठी दरमहा रुपये ५००/- रुपये अशी शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.
मुली- अनिषा काळे – २० गुण, संजना पाला- २३ गुण, नंदिनी पेठकर २१ गुण
मुले अर्थव संकल्प २० गुण, आयुश राजापूरे – २३ गुण, तन्मय राजापूरे – २१ गुण
या स्पर्धेत मुला- मुलींची ६, ८, १०, १२, १४, १६ पुरुष व महिला खुला गट असे एकूण १४ गटात एकूण ६२ प्रकारात ही स्पर्धा घेण्यात आली.












