पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. २९ : अंमली पदार्थ विरोधी पथक- २ यांनी ६० लाख रुपयांचे अफिम जप्त केल्याची घटना उघडकीस आली आहे.ही घटना दि. २८ रोजी हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे.
अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वपोनि सुनील थोपटे हे त्यांच्या स्टाफसह हडपसर पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत होते.त्यावेळी पोलीस अंमलदार योगेश मांढरे यांना बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की एक इसम बदरके यांच्या गोडाऊन जवळील फुरसुंगी येथील सार्वजनिक रोडवर अफीम विक्री करिता येणार आहे.वपोनि सुनील थोपटे यांनी विरोधी पथकातील स्टाफसह मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जाऊन कारवाई केली.
आरोपी मोहनलाल मेगाराम बिश्नोई ( वय २४, रा. बगरापूर, राजस्थान ) याच्याकडे एकूण ६०,१०,०००/- चा मुद्देमाल सापडला आहे. यामध्ये ६०,००,०००/- किमतीचे अफीम आणि १०,०००/- किमतीचा एक मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आरोपीवर एनडीपीएस ॲक्ट कलम ८(क) ,१७ ( क ) अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी श्री. रामनाथ पोकळे सो, मा.अपर पोलिस आयुक्त गुन्हे,श्री. अमोल झेंडे, सो मा.पोलिस उप आयुक्त गुन्हे, श्री. सतीश गोवेकर सो, सहाय्यक पोलिस आयुक्त गुन्हे २ यांचे मार्गदर्शनाखाली पो.निरी. सुनील थोपटे, पोलीस उपनिरीक्षक एस. डी. नरके. दिगंबर चव्हाण, पोलीस अमलदार, योगेश मांढरे. शिवाजी घुले, प्रशांत बोमादंडी. संतोष देशपांडे,संदीप जाधव,महेश साळुंखे, नितीन जगदाळे, युवराज कांबळे,संदीप शेळके,रवी रोकडे यांनी केली आहे.












