पुणे प्रतिनिधी
पेडगावचे सामाजिक कार्यकर्ते व कॉर्पोरेट ट्रेनर नितीन संपत घोडके यांना यंदाचा कॉर्पोरेट क्षेत्रातील इंडियन टॅलेंट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
जेष्ठ अभिनेते सुनील गोडबोले , अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ अध्यक्ष मेघराज राजे भोसले व अभिनेत्री आर्या घारे यांच्या हस्ते सन्मान चिन्ह व ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला.
गेल्या तेरा वर्षांमध्ये सामाजिक क्षेत्र व कॉर्पोरेट क्षेत्र यांचा योग्य समन्वय साधत हजारो विद्यार्थ्यांना कॉर्पोरेट क्षेत्रात पोहचवण्याचे काम त्यांनी केले आहे.
नुकतेच त्यांचे जावा प्रोग्रामिंग लेन्गवेज चे पुस्तक
प्रकाशित झाले आहे.
यानिमित्ताने त्यांचे तालुक्यातील वेगवेगळ्या भागातून अभिनंदन होत आहे.












