पिंपरी – क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सांस्कृतिक भवन ट्रस्टच्या अध्यक्षा ॲडव्होकेट संध्या भुजबळ यांना राजमाता जिजाऊ रणरागिनी गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
महिला दिनानिमित्त महाराष्ट्रीयन फाऊंडेशन या संस्थेच्या वतीने उल्लेखनीय सामाजिक कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात येणार असून विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार संस्थेचे प्रदेश अध्यक्ष व जेष्ठ पत्रकार श्यामराव दौंडकर यांनी जाहीर केले आहेत. मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान सोहळा रविवार दिनांक १० मार्च २०२४ रोजी दुपारी २ वाजता श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात होणार आहे.