सध्या दुचाकीवरून जबरदस्तीने लोकांच्या वस्तू चोरी करण्याच्या घटना वाढल्या आहेत. पुण्यातील अनेक ठिकाणी अशा घटना दैनंदिन होताना दिसत आहेत. अशीच एक घटना शिवाजीनगर परिसरात शनिवारी घडली.
कृष्णा प्रेसिडेन्सी बांबू हाऊस येथे फिर्यादी त्यांची गाडी पार्क करत होते. त्याचवेळी दुचाकी वरून त्यांच्याजवळ चार अनोळखी इसमांनी येऊन त्यांना पैसे व मोबाईल मागितला. नकार दिला असता इसमांनी एकत्र येऊन फिर्यादीस लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. फिर्यादी यांना खाली पाडून कोणत्यातरी कठीण वस्तू त्यांच्या डोक्यात मारली. या घटनेत फिर्यादींच्या डोक्याच्या उजव्या बाजूला त्यांच्या उजव्या हातातील सोन्याची अंगठी आणि गळ्यातील सोन्याची साखळी असं एकूण रुपये 1 लाख 35 हजार रुपयाची चोरी इसमांनी केली.
याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये भादविक 394 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे
पुढील तपास पोलीस करत आहेत
अनोळखी इसमांनी मारहाण करून केली चोरी












