पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. १९ : सुमारे दिड वर्षापुर्वी हडपसर येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार सनी रावसाहेब कांबळे यास बाबु ठाकुर याने मारहाण केली होती. त्याबाबतची टिप बाबु ला स्वप्नील झोबार्डे याने दिल्याचा संशय सनी कांबळे यास होता. त्यामुळे सनी कांबळे व स्वप्नील विठ्ठल झोबार्डे वय १७ वर्षे रा. मिरेकर वस्ती, हडपसर पुणे याचेमध्ये वाद होत होता. त्या कारणावरुन सनी कांबळे व त्याचे साथीदार यांनी स्वप्नील झोबार्डे याचा खुनाचा कट रचुन करुन दि. १७ रोजी १० च्या सुमारास स्वप्नील झोबार्डे यास समझोता करण्याचे इरादयाने बोलावुन घेवुन सनी कांबळे व त्याचे साथीदार यांनी स्वप्नील झोबार्डेच्या डोक्यात कोयत्याने वार करुन खुन केला. सनी व त्याच्या साथीदारां वर हडपसर पो.स्टे. येथे भा.द.वि. कलम ३०२, ३४ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दाखल गुन्हयातील मुख्य आरोपी सनी रावसाहेब कांबळे व अमन नवीद शेख हे गुलबर्गा, कर्नाटक येथे पळुन जाण्याचे तयारीत असताना पुणे शहर गुन्हे शाखा युनिट -०५ चे पोलीस अमंलदार यांना मिळालेल्या बातमीवरुन त्यांना लोणी टोलनाका, पुणे सोलापुर रोड येथुन ताब्यात घेतले असुन उर्वरीत आरोपी सरताज नबीलाल शेख,रोहीत शंकर हनुवते, बाबु नामदेव मिरेकर यांना म्हाडा कॉलणी येथुन ताब्यात घेणेत आलेले आहे. दाखल गुन्हयात १) सनी रावसाहेब कांबळे वय २३
२) अमन नवीद शेख वय २२ वर्षे ३) सरताज नबीलाल शेख वय २० वर्षे
४) रोहीत शंकर हनुवते वय २२ वर्षे
५) बाबु नामदेव मिरेकर वय ५४ वर्षे सर्व राहणार हडपसर पुणे यांना युनिट ०५, गुन्हे शाखेने १२ तासाचे आत शिताफिने पकडुन सदरचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे.
सनी कांबळे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन त्याचे विरुध्द या आदी हि गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे.
सदरची कारवाई पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त, संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त, अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त, सतिश गोवेकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी, सहायक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर, पोलीस उप निरीक्षक अविनाश लोहोटे, पोलीस अमंलदार प्रताप गायकवाड,अकबर शेख, शहाजी काळे, प्रमोद टिळेकर, विनोद शिवले, राजस शेख, अमित कांबळे, राहुल ढमढेरे, दाऊद सय्यद,रमेश साबळे, दया शेगर, स्वाती गावडे, पल्लवी मोरे, संजयकुमार दळवी यांनी केलेली आहे.












