पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. ०१ : नात्या – नात्यामध्ये अनेक गुन्हेगारी कृत्य घडत असतात हे आपल्याला ठावूक आहे. अशीच एक भाच्याने मामाला लुटल्याची घटना उघडकीस आली असून ही घटना लष्कर पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे.
पीडित मामाने त्याचा भाचा आकाश गोरख कांबळे ( वय २४ रा. भोपळे चौक, पुणे ) व त्याचा एक साथीदार यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
आरोपी याने फिर्यादी यांना फोन करून कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल,पुणे या ठिकाणी भेटायला बोलावले.फिर्यादी हे भेटायला गेले असता आरोपीने त्यांच्याकडे १,००० रुपये मागितले.फिर्यादी यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपीने त्याच्या साथीदाराच्या मदतीने त्यांना रिक्षातून बाहेर ओढून मारहाण करत त्यांच्या खिशातील १,०५० रुपये काढून घेतले.तसेच त्यांची रिक्षा घेऊन पळून गेले आहेत.
आरोपींवर भादवी कलम ३९२,३८४,३४ अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.एका आरोपीचा शोध सुरू असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार गायकवाड हे करत आहेत.












