पुणे | प्रतिनिधी
पुणे,दि. २१ : आकासा एअरच्या पुणे-दिल्ली फ्लाइटमधील प्रवाशांपैकी एका प्रवाशाने त्याच्या बॅगेत बॉम्ब असल्याचा दावा केल्याने विमानाचे मुंबई येथे इमर्जन्सी लँडींग करावे लागले. पुणे विमानतळावरून या विमानाने उड्डाण केल्यानंतर दिल्लीच्या दिशेने जात असताना ही घटना घडली. प्रवाशांनी केलेल्या दाव्यामुळे विमान कंपनीचे कर्मचारी सतर्क झाले आणि संबंधित अधिकाऱ्यांना हे प्रकरण कळवण्यात आले.
बॉम्ब शोधक आणि निकामी पथकाची (BDDS) टीम आधीच वाट पाहत असलेल्या मुंबई विमानतळाकडे विमान वळवण्याचा निर्णय घेण्यात आला. विमान मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर बीडीडीएस अधिकाऱ्यांनी प्रवाशाच्या बॅगची कसून तपासणी केली, पण त्यात काहीही संशयास्पद आढळले नाही.
अकासा एअर फ्लाइट QP ११४८, २१ ऑक्टोबर २०२३ रोजी पुण्याहून दिल्लीला ००:०७ वाजता उड्डाण केले आणि १८५ प्रवासी आणि सहा क्रू मेंबर्स घेऊन उड्डाण घेतल्यानंतर लगेचच सुरक्षा सूचना प्राप्त झाली,” आकासा एअरने अधिकृत निवेदनात म्हटले आहे .”सुरक्षा आणि सुरक्षेच्या प्रक्रियेनुसार, विमान मुंबईकडे वळवण्यात आले. कॅप्टनने योग्य ते सर्व आवश्यक आपत्कालीन प्रक्रियांचे पालन केले आणि ००:४२ वाजता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई येथे सुरक्षितपणे उतरवले,” असे निवेदनात म्हटले आहे.
या प्रवाशाला मुंबई विमानतळ पोलिसांनी ताब्यात घेतले असून याप्रकरणी अधिक व सखोल तपास पोलीस करत आहेत.












