मुंबई प्रतिनिधी
देशभरात गणेशोत्सवाचा सण मोठ्या थाट्यामाट्यात साजरा होतो आहे. गणरायाचा आगमनामुळे सर्वत्र आनंददायी वातावरण आहे. शहरातील सार्वजनिक आणि मानाच्या गणेश मंडळात गणरायाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली आहे. मुंबईत गणेशोत्सवाची वेगळीच धमाल पहायला मिळत आहे. आता मोठ्या उत्साहाच्या वातावरणात लालबागच्या राजाचा दरबार सजला असून गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे.
नवसाला पावणारा संकट दूर करणारा म्हणून ख्याती असलेल्या लागबागच्या राजाच्या दर्शनासाठी तर बॉलिवूड स्टारही गर्दी करतात. केवळ मुंबईच नाही तर देशभरातील गणेश भक्तांना राजाच्या दर्शनाची आस लागलेली असते. दरम्यान आज विधान परिषदेचे सदस्य, बीड – धाराशिव – लातूर सुरेश धस, तसेच माननीय मुख्यमंत्री यांचे मराठवाड्यातील दूत म्हणून संबोधले जाणारे इंदोरचे उद्योजक परमेश्वर येवले यांनी लालबागचा राजा चे दर्शन घेतले यावेळी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.












