डीजेवर उन्हात नाचतांना काळजी घ्या
गेल्या चार ते पाच दिवसांपासून तापमानात भरपूर वाढ झाली असून अशा या उन्हाच्या तडाख्यात सध्या लग्नाचा धडाका सुरू आहे. दुपारी लागणारे लग्न, तापमानात डीजेवर नाचणारी वऱ्हाडी मंडळी त्यामुळे लग्न मुहूर्तावर न लागण्याचे प्रमाण वाढले आहे. एप्रिल महिन्यात विवाहांचे मुहूर्त मोजकेच असल्याने मेमधील मुहूर्तावर लग्न करणाऱ्यांची संख्या जास्तच आहे. एप्रिलमध्ये अवकाळीचे सावट आणि ढगाळ वातावरण असल्याने तापमानाची तीव्रता विशेष जाणवली नाही. मेमध्ये मात्र तापमानाने उच्चांक गाठण्यास सुरुवात केली आहे. सकाळी १० वाजेच्या पुढे वाढत जाणारे तापमान सायंकाळी ५ पर्यंतही कमी होताना दिसत नाही. उन्हाळ्यातील लग्न सोहळ्याला हजेरी लावणे म्हणजे मोठे दिव्यच असते; पण जवळच्या नात्यातील व मित्र परिवारातील लग्न असले तर उपस्थिती आवश्यकच असते. घराबाहेर पडताना डोक्यावर पूर्णपणे झाकला जाईल, असा पांढरा बागायती रुमाल लावूनच बाहेर पडले पाहिजे, अशी स्थिती आहे. यात लग्न सोहळ्यांमुळे एसटीला मोठी गर्दी असल्याने दुचाकी अथवा चारचाकी वाहनांच्या वापर करावा लागतो. गेल्या चार ते पाच दिवसांपासून दुपारच्या वेळेस रखरखत्या उन्हामुळे रस्त्यावर शुकशुकाट दिसत आहे. थंड पाण्यासोबतच उसाचा रस, थंड पेय,आइस्क्रीम, बर्फाचे गोळे याकडे नागरिकांचा ओढा दिसून येत आहे. गेल्या काही वर्षपासून लग्नाआधीच्या दिवशी हळदी लावण्याची प्रथा कायम आहे. हळदीच्या कार्यक्रमाला जवळचे नातेवाईक व मित्र परिवाराला पंगत दिली जाते. लग्न मिरवणुकी सोबतच हळदीच्या दिवशी देखील डीजे लावून नाचण्याचा ट्रेंड सध्या वाढल्याचे दिसत.
चौकट –
ही काळजी घ्या
दिवसभर भरपूर पाणी प्यावे.
जास्त तापमानात प्रवास टाळावा.
लहान मुलांना बाहेर पडू देऊ नये.
दुपारच्या लग्नात वाढत्या तापमानात नाचणे टाळावे.
चौकट –
यंदा मुहूर्त अधिक
मे व जूनमध्ये विवाहाचे मुहूर्त अधिक असल्याने मोठ्या संख्येने लग्न उरकली जात आहे. ज्या दिवशी लग्नाची संख्या जास्त असेल त्यादिवशी मंगल कार्यालय फुल्ल असल्याने घरासमोर मंडप टाकूनलग्न लावण्याकडे अनेकांचा कल दिसून येत आहे.
दुपारच्या वेळेत उन्हातून आल्यावर लगेच च थंड पाणी किंवा थंड पेय घेऊ नये. लिंबू पाणी , नारळ पाणी आणि कोकम हे पिण्यामध्ये जास्त प्रमाणात असावे. दुपारी १२-४ च्या दरम्यान शक्यतो बाहेर पडू नये. लोकांनी लग्नाचा मुहूर्त संध्याकाळी घ्यावा
डॉ धोंडिबा दापेगावे
साई रुग्णसेवा क्लीनिक
लग्नाची वरात हि संध्याकाळी घ्यावी जेणेकरून उन्हाचा संबंध येणार नाही. दुपारच्या वेळेत लग्न कार्य करून घ्यावे. आळंदी मध्ये ट्रॅफिक असल्याकारणाने आम्ही वरात पाककजे मध्ये देतच नाही आणि उन्हाळ्या निम्मित आम्ही कार्यालयात मठ्ठा पेय म्हणून ठेवतो.
कौशिक जोशी
प्रणव मंगल कार्यालय आळंदी












