पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. २२ : कात्रज येथील हुजूरपागा कन्या माध्यमिक शाळा येथे परिवहन समिती तर्फे मार्गदर्शन पर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
या आयोजित व्याख्यानात पोलिस हवालदार सत्यप्रेम तोंडे यांनी स्कूल बस आणि चालक यांना मुलींना सुरक्षित शाळा ते घर कसे ने – आण करता येईल ट्रॅफिक मध्ये त्यांना कशा प्रकारे सुरक्षा देता येईल या विषयी मार्गदर्शन केले.तसेच विद्यार्थ्यांना पुढील करियर,मोबाईलचा वापर,वाढती व्यसनाधीनता, बाल गुन्हेगारी,ट्रॅफिक आणि त्यावरील उपाय या विषयी मार्गदर्शन करण्यात आले.लोकप्रतिनिधी व नगरसेवक श्री प्रकाश कदम यांनी ट्रॅफिक आणि त्यावरील उपाय याविषयी मार्गदर्शन केले.
यावेळी मुख्याध्यापिका सौ.भूमकर,सहशिक्षिका नोकिया खान,संगीता वाघमारे,शिक्षक राजेंद्र मानेकर, लोकप्रतिनिधी व नगरसेवक श्री प्रकाश कदम,पोलिस हवालदार सत्यप्रेम तोंडे तसेच १४० विद्यार्थिनी व ३० ते ४० बस चालक आदी उपस्थित होते.












