पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. २५ : पुणे परिसरात कॉफी शॉप तोडून टाकण्याची धमकी देत दोघा जणांनी मिळून एका इसमावर प्राण घातक हल्ला केला आहे. ही घटना कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन हद्दीत घडली आहे.
वैभव शेंडगे ( वय ३१ रा. कात्रज पुणे ) यांनी दोन इसमांविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.
दिनांक 22 रोजी फिर्यादी हे मंगलदास रोडवरील कॅनॉट प्लेस येथील कॉफी शॉप वर काम करत होते. त्यावेळी आरोपींनी तेथे येऊन फिर्यादी यांच्याकडे पैशाची मागणी केली. फिर्यादी यांनी पैसे दिले नाही त्यामुळे तू शॉप बाहेर ये,नाहीतर तुझे कॉफी शॉप तोडून तुझी वाट लावून टाकेल अशी धमकी दिली. आरोपींनी त्यांच्या इतर साथीदारांच्या मदतीने फिर्यादी यांना धक्काबुक्की करून शिवीगाळ केली. तसेच छोट्या चाकूने डोक्याच्या दोन्ही बाजूस, डाव्या हाताच्या दंडावर व पोटावर डाव्या बाजूस वार करून जखमी केले आहे.
आरोपींवर भादवि कलम ३२६,३२४,३२३,५०६,३४ अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून अद्याप आरोपींना अटक करण्यात आली नाही. सदर घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नवनाथ क्षीरसागर हे करीत आहेत.












