पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. २२ : आपण कॉलेजचे ट्रस्टी असल्याचे भासवत कुलगुरूंच्या ऑफिस मध्ये जबरदस्ती घुसल्याची घटना समोर आली आहे.ही घटना वाकड पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे.
याप्रकरणी डॉ. शिवचंद्र बसप्पा आगासे ( वय ७६, सिल्व्हर ऑर्चड्स,वाकड ) यांनी परंधामन, चेंदुर्वधिनी, जयबालन, शितकल,सुधाकर यांच्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली आहे.
फिर्यादी यांच्या माहितीनुसार दि. २० रोजी बालाजी युनिव्हर्सिटी येथे कॉलेजमधून काढून टाकलेले कर्मचारी परंधामन, चेंदुर्वधिनी, जयबालन हे शितकल,सुधाकर या दोन जणांना घेऊन आले.कॉलेजच्या परवानगी शिवाय आत येऊन आम्ही कॉलेजचे ट्रस्टी असल्याचे भासवत कुलगुरूंच्या ऑफिसचे बंद असलेले दार तेथील सेक्युरिटी गार्ड यांना धक्का बुक्की करत बनावट चावीने उघडले.तसेच विना परवानगी आतमध्ये जबरदस्ती प्रवेश केला.
आरोपींवर भादवी कलम १४३,१४७,४५२,३२३ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून अद्याप आरोपींना अटक करण्यात आली नाही.सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक गिरनार हे करत आहेत.












