पुणे | प्रतिनिधी
पिंपरी, दि. ९ – दि. ०९ ऑगस्ट रोजी क्रांती दिनाचे औचित्य साधून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षापूर्वीच्या पार्श्वभूमीवर “माझी माती माझा देश” या उपक्रमांतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिका, उद्यान आणि वृक्षसंवर्धन विभागा तर्फे सी. एम. ई. दापोडी येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी आयुक्त ( प्रशासक ) शेखर सिंह, कर्नल आशिष रायसिंघानी (कमांडर सिटीडब्लू सीएमई), अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, उपायुक्त रविकिरण घोडके, सहाय्यक उद्यान अधिक्षक राजेश बसावे तसेच मंजुषा हिंगे, चंद्रकांत गावडे, सुरेश घोडे तसेच इतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला.












