पुणे ता 7 : बिबवेवाडी परिसरातील मयत श्रीकांत मच्छिंद्र जाधव यांच्या खुना प्रकरणी फरार असलेला आरोपी संकेत उर्फ मोन्या संतोष विकारे याला बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी विरोधात मोक्का , खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, दरोडा, विनापरवाना पिस्तूल बाळगणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार २४ मे रोजी दोन साथीदारांसह सुनील पारेकर यांनी अर्श टेलर दुकाना समोर मयत श्रीकांत मच्छिंद्र जाधव (वय 38 रा. राजीव नगर, बिबवेवाडी) यांच्यावर हल्ला करत डोक्यात विटेने मारून गंभीर जखमी करून ठार मारले होते. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार होता.
तपास पथकातील अंमलदार अभिषेक धुमाळ यांना गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहितीवरून आरोपी संकेत उर्फ मोन्या संतोष विकारे (वय 27 रा. राजीव गांधी नगर, बिबवेवाडी) याला मांगडेवाडी, कात्रज येथून अटक करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी पुणे पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, उप आयुक्त परिमंडळ ५ विक्रांत देशमुख, सहा. पोलीस आयुक्त शाहूराजे साळवे, वानवडी विभाग पुणे शहर, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सविता ढमढेरे, पोलीस निरीक्षक, गुन्हे, हिवरकर, तपास अधिकारी सहा.पोलीस निरीक्षक प्रवीण काळुखे, पोलीस उपनिरीक्षक संजय आदलिंग, पोलीस हवालदार संतोष जाधव,अभिषेक धुमाळ, शिवाजी येवले, प्रवीण पाटील, सतीश मोरे, ज्योतिष काळे, तानाजी सागर व अतुल महांगडे यांनी केली आहे.
खुनाच्या गुन्ह्यातील फरार असलेल्या आरोपीस केले जेरबंद












