पुणे प्रतिनिधी
पुणे दि.२७ : रामटेकडी परिसरात अण्णा भाऊ साठे उद्यानामागे रस्त्यालगत एक इसम संशयास्पद हत्यार घेऊन थांबला असल्याचा प्रकार समोर आला आहे. संतोष जैनाथ शुक्ला (वय ५० रा साडे सतरा नळी,हडपसर मु.पो. उत्तर प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ही कारवाई कोम्बिंग अपप्रेशन दरम्यान करण्यात आली आहे.
सदर घटनेत आरोपी हा रामटेकडी परिसरात अण्णा भाऊ साठे उद्यानामागे रस्त्यालगत हत्यार घेऊन थांबायची माहिती पोलीस पथकातील अंमलदार संदीप साळवे, राहुल माने,गोसावी, कदम, नाईक यांना मिळाली. त्या अनुषंगाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या कडून एक गावठी पिस्टल व दुचाकी असा एकूण दीड लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी विरोधात भारतीय हत्यार कायदा कलाम ३(२५), महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)(३) सह १३५ अंतर्गत वानवडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वानवडी पोलीस करीत आहेत.
सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा,पोलीस उप आयुक्त परी-५ विक्रांत देशमुख, सह पोलीस आयुक्त शाहूराजे साळवे,यांच्या मार्गदर्शना खाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाठारे,पोलीस निरीक्षक विनायक पाटणकर,पोलीस उप निरीक्षक संतोष सोनावणे,अंमलदार संदीप साळवे, राहुल माने,गोसावी ,कदम, नाईक यांनी केले आहे.
गावठी पिस्टल बाळगणाऱ्याला वानवडी पोलिसांचा दणका












