पुणे | प्रतिनिधी
पुणे दि.१० : नाना पेठ मधल्या मुकेश ट्रेडर्स दुकानाच्या शटरचे लॉक तोडून जवळ पास रोख रक्कम चार लाख रुपया सह सी.सी.टी.व्ही,डी.व्ही.आर मशीन चोरल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना १ ते २ ऑगस्ट दरम्यान घडली होती. या प्रकरणी अज्ञात विरोधात समर्थ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी आरोपी सह एकाला पकडण्यात आले असून दुसरा आरोपी फरार आहे. सुरजित भूवाल सरोज (वय २३ रा.प्रतापगड,उत्तरप्रदेश),अजय उदरकुमार सरोज (वय १९ रा.सदर), गंगा सरोज (नाव,पत्ता माहित नाही) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे.
या बाबत अधिक माहिती अशी कि सदर तपासा दरम्यान आरोपीचा चेहेरा सी.सी. टी.व्ही फुटेज मध्ये स्पष्ट दिसत नसल्याने घरफोडी झालेल्या दुकानाच्या परिसरातील जवळ पास १०० सी.सी.टी.व्ही फुटेज तपासण्यात आले होते. त्यातील एका फुटेजच्या आधारे आरोपी पुणे रेल्वे स्थानकाच्या परिसरात पार्सल यार्ड येथे थांबला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या अनुषंगाने आर.पी.एफच्या मदतीने आरोपीला ताब्यात घेण्यात आले. चौकशी दरम्यान आरोपीने सदर गुन्हा केला असल्याची कबुली दिली आहे. सदर आरोपींकडून दोन लाख ३० हजार रुपये किंमतीचा मुद्दे माल जप्त करण्यात आला आहे.
आरोपी विरोधात भा.द.वि.कलाम ४५४,४५७,३८०, अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त प्रवीण कुमार पाटील,पोलीस उप आयुक्त परी-१ संदीप सिंह गिल, सह पोलीस आयुक्त (फरासखाना विभाग) अशोक धुमाळ,यांच्या मार्गदशना खाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे समर्थ पोलीस स्थानक,पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे, सुनील रणदिवे, पोलीस आमदार दत्तात्रय भोसले, प्रमोद जगताप, गणेश वायकर,रोहिदास वाघेरे,रहीम शेख, हेमंत पेरणे, अमोल शिंदे, शरद घोरपडे, कल्याण बोराडे, ज्ञानेश्वर सूर्यवंशी, संदीप पवार, अर्जुन कुडाळकर, आरपीएफ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रघुवंशी,पोलीस उपनिरीक्षक उबाळे, अमलदार दराडे, प्रशांत बोरसे यांनी केले आहे.












