पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. २८ : घरात कोणी नसल्याचा फायदा घेत घरफोडी केल्याची घटना उघडकीस आलेली आहे.ही घटना चंदन नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे.फिर्यादीने अनोळखी इसमाविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.
फिर्यादी हे त्यांच्या नातेवाईकांकडे सुट्टीसाठी गेले होते.त्यावेळी ते घरी नसल्याचा फायदा घेत एका अनोळखी इसमाने देवएक्झोटीका सोसायटी मधील त्यांच्या फ्लॅटच्या हॉलच्या खिडकीची स्लायडिंग ची जाळी कशाच्या तरी साहाय्याने कट करून त्या वाटे घरात प्रवेश केला.घरातील ४,५२,००० किमतीचे सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा ऐवज लंपास केला आहे.
आरोपीवर भादंवि कलम ३८०,४५४,४५७ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आलेला असून अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.सदर घटनेचा तपास पोलीस उप निरीक्षक पालवे हे करत आहेत.












