पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. २० : किरकोळ वादातून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे.सदर घटना सहकार नगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे.
समीर काझी ( वय ३२, रा.शिवदर्शन, पर्वती ) यांनी एका इसमाविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली आहे.
दि. १८ रोजी फिर्यादी हे पुणे सातारा रोड वरील देशी दारूच्या दुकानामध्ये गेले होते.तेव्हा आरोपी हा सुद्धा तेथे येऊन फिर्यादी यांना पाहून शिव्या देऊ लागला. फिर्यादीने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला पण त्याने त्यांचे एकले नाही.फिर्यादी यांनी आरोपीच्या तोंडात चापट मारली असता त्याने चिडून त्याच्या जवळ असणाऱ्या चाकूने फिर्यादी यांना भोसकले.तसेच त्यांना जखमी करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला आहे.
आरोपीवर भादवी कलम ३०७,५०४ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक पी. टी. जगताप हे करत आहेत.












