पुणे प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड दि.१३ : शेतात काम करत असणाऱ्या सासू,जाऊ व सुनेवर कोयत्याने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना बुधवार दि.१२ रोजी शिरगाव येथे दुपारच्या सुमारास घडली आहे. जखमी महिलेवर पावन हॉस्पिटल येथे उपचार चालू आहे.
आरोपी विरोधात एका महिलेने शिरगाव पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. ओंकार बाळू घोटकुले (वय २३ रा.आढले,ता.मावळ,जि.पुणे), बाळू सोनबा घोटकुले (वय ५० रा. सदर), एक महिला (रा.सदर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. सदर जमिनीचा वाद हा जुना असून फिर्यादी हे शेतात काम करत असताना आरोपींनी शिवीगाळ करत दमदाटी केली.
सदर आरोपी महिलेच्या हातातील कोयत्याने रुपाली घोटकुले(सुनबाई) यांच्यावर डोक्याच्या उजव्या बाजूला कोयत्याने वार केला आहे. आरोपी विरोधात शिरगाव पोलीस स्थानकात भ.द.वि कलम ३०७,५०४,५०६,३४,मह पोलीस कायदा कलाम ३७,(१),(३) भारतीय हत्यार कायदा कलाम ४ (२५) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक गावीत करीत आहेत.











