पिंपरी चिंचवड प्रतिनिधी
चिखली पोलीस स्टेशनच्या हद्दीतून दि.२८ रोजी एक भंगार व्यवसायिक नामे सिराज अब्दुल हसन खान हा कुदळवाडी येथून बेपत्ता झालाची तक्रार सिराज याचे चुलते मिजाज अहमद अब्दुल हसन खान यांनी दिली होती. त्या अनुषंगाने चिखली पोलिसांनी शिराज बाबतची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली.
तपास करताना तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे व बारकाईने पाहणी केली असता सिराज हा जायकाचा कुदळवाडी या ठिकाणी येऊन त्याच्या मित्रसेफुद्दीन खान यांच्यासोबत दुचाकीवरून मोशी कडे जात असताना कळून आले.
त्यामुळे सैफुद्दीन खान त्याच्याबद्दल संशय निर्माण झाल्याने चिखली पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची सखोल चौकशी केली. चौकशी दरम्यान त्याने उडवाउडुची उत्तरे दिली मात्र तपासाची हातखंडे वापरले असता ‘गेल्या दीड ते दोन महिन्यांपूर्वी सिराज व त्याच्यामध्ये कंपनीचे भंगार घेण्यावरून वाद झाले होते. त्यावेळेला सीराज ने मला जमडाटी करून कुदळवाडी परिसरात राहणाऱ्या मुलांना मारहाण करण्यासाठी पाठवले होते.
सिराजकडून भविष्यकाळात माझ्या जीवाला धोका होऊ शकतो त्यामुळे मी माझ्या ओळखीचा मुंबई येथे राहणाऱ्या मोहम्मद आणि यास फोन करून बोलून घेतले. व दि.२८ रोजी सायंकाळी सहा वाजता महाराज सीराजी आज कुदळवाडी येथून जबरदस्तीने भंगार घेण्याचे खोटे कारण सांगून मोटरसायकल वर बसून चाऱ्होली कडून डि. वय. पाटील कडे जाणाऱ्या रस्त्याच्या प बाजूस असणाऱ्या जंगलात नेऊन त्याच्या डोक्यात हातोडी मारून त्याचा खून केला व मृतदेह जंगलात टाकून दिला ‘ अशी कबुली दिली.
सैफुद्दीन यांच्या सांगण्यावरून त्याची सत्यपाल करण्याकरिता चिखली पोलीस स्टेशनचे तपास पथक तक्रार सदरच्या ठिकाणी पाहणीसाठी गेले. व चार तासाच्या अथक प्रयत्नानंतर त्यांना शिराज्याच्या कुजलेल्या मृतदेह आढळून आला सतत पडणारा पावसामुळे तो उजला होता. त्याच्यात कपड्यावरून व बाह्य दिसण्यावरून तक्रारदाराने त्याचा मृतदेह ओळखलं चिखली पोलिसांनी तात्काळ मृतदेह विच्छेदनासाठी पाठवत सैफुद्दीन व मोहम्मद अनीस त्याच्यावर कुणाचा गुन्हा दाखल करून मोहम्मद अनीस याला मुंबईतून ताब्यात घेतला आहे.
सुधीरची कारवाई वरिष्ठांच्या चिखली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर, चिखली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सह पोलीस निरीक्षक तौफिक सय्यद, पोलीस उपनिरीक्षक बारावकर, पो. हवा. सी. डी. सावंत, पो.हवा. साकोरे, पो. ना. सुतार, व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे कर्मचारी यांनी केली आहे.












