पुणे : गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या नोबेल पारितोषिकप्राप्त ‘गीतांजली‘ या काव्यसंग्रहाचा डॉ. ज्योती रहाळकर यांनी मराठीत केलेल्या काव्यसंग्रहाचा प्रकाशन समारंभ सोमवारी (दि. 7) आयोजित करण्यात आला आहे.
सिग्नेट पब्लिकेशन आयोजित प्रकाशन समारंभ सायंकाळी 5:30 वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. ‘गीतांजली‘ (मराठी अनुवाद) या काव्यसंग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. न. म. जोशी यांच्या होणार असून वंदना बोकील–कुलकर्णी यांची विशेष उपस्थिती असणार आहे, अशी माहिती सिग्नेट पब्लिकेशनचे संचालक ॲड. प्रमोद आडकर आणि डॉ. ज्योती रहाळकर यांनी निवेदनाद्वारे दिली.
पुस्तक प्रकाशन सोहळ्यानंतर मूळ इंग्रजी आणि अनुवादित कवितांवर आधारित अभिवाचन आणि सांगीतिक सादरीकरण होणार आहे. यात अरुजा रहाळकर, प्रांजल अक्कलकोटकर, संजित घाटपांडे यांचा सहभाग असणार आहे.












