पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. २५ : दोन तरुणांनी मिळून सोसायटीच्या पार्किंग मधील इलेक्ट्रिक दुचाकी पेटवली आहे. ही घटना उत्तम नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे.
याप्रकरणी रोहित पायगुडे ( वय २६, रा. संस्कार कॉलनी, खडक माळ, पुणे ) यांनी दोन अनोळखी इसमांविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.
दिनांक २४ रोजी फिर्यादी यांनी त्यांच्या राहत्या घराच्या पार्किंग मध्ये इलेक्ट्रिक दुचाकी ही पार्क केली होती. त्यावेळी दोन अज्ञात इसमांनी काही कारण नसताना त्यांची इलेक्ट्रिक दुचाकी आग लावून पेटवून दिली आहे. यामुळे त्यांचे ४८,००० रुपयांचे नुकसान झाले आहे.
आरोपींवर भादवि कलम ४३५,३४ अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून अद्याप आरोपींना अटक करण्यात आले नाही. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार नांगरे हे करत आहेत.












