पुणे | प्रतिनिधी
पुणे दि.२२ : चारचाकी गाड्यांचे शोरूम फोडणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीला पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आले आहे. या प्रकरणी सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. सदर टोळीने पुण्यासह सातारा, अमरावती, ठाणे ,कोल्हापूर, नवी मुंबई व कर्नाटकातील शिमोगा, विजापूर,रायचूर,बल्लारी,आणि गोव्यातील वेरणा येथील गाड्यांचे शोरूम फोडले आहेत.
सावन दवल मोहिते (वय 19 मु.पो. ता.अक्कलकोट, जि.अकोला), बादल हरिलाल जाधव (वय 19 मु.पो. जि.जळगाव), सोनू नागूला मोहिते (वय 22 बोदवड जि. जळगाव) अभिषेक देवराम मोहिते (वय 20 मु.पो. जि.जळगाव),जितू मंगलसिंग बेलदार (वय 23 मु.पो.जि.जळगाव), पिंटू देवराम चोहान (वय 19 इंदूर, मध्य प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत.
दि.२७ व २८ जुलै दरम्यान बिबवेवाडी येथील देवकी मोटर्स, एल.एल.पी टाटा मोटर्सच्या शोरूमची मागील खिडकीची ग्रिल तोडून गोदरेज कंपनीच्या तेजोरीतून ५ लाख रुपये रोख रक्कम चोरल्याची घटना घडली होती. या प्रकरणाचा तपास बिबवेवाडी पोलीस व युनिट -५ करीत होते. तपासा दरम्यान २०१९ मध्ये अशा प्रकारे चोरीच्या ६ घटना घडल्याचे समोर आले आहे. युनिट – ५ कडून बांद्रा (मुबई) रेल्वे स्थानकावर सापळा रचून आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. चौकशी दरम्यान पुण्यातील २,गोव्यातील २,कर्नाटकातील १०,सातारा, अमरावती व कोल्हापूरतील – १,ठाणे व नवी मुंबई प्रत्येकी २ गुन्हे उघडकीस आले आहे.
या पूर्वी सदर गुन्ह्यातील आरोपी सोनू नागूला मोहिते याच्यावर जळगाव पोलिसात ७ गुन्हे,बादल हरिलाल जाधव याच्यावर औरंगाबाद व जळगाव पोलिसात १ गुन्हा तर पिंटू देवराम चोहान याच्यावर जळगाव पोलिसात १ दाखल आहेत. सदर आरोपीं विरोधात भा.द.वि. कलाम ४५४,४५७,३८०, अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सह संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सह पोलीस आयुक्त सतीश गोवेकर, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उल्हास कदम, सह पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर, पोलीस उपनिरीक्षक अविनाश लोहोटे, पोलीस आमदार चेतन चव्हाण, राजस शेख, पृथ्वीराज पांडुळे, राहुल ढमढेरे, विलास खंदारे, दाऊद सय्यद, अमित कांबळे, रमेश साबळे, दया शेगर, प्रताप गायकवाड, प्रमोद टिळेकर, अश्रुबा मोराळे, शहाजी काळे, विनोद शिवले, अकबर शेख, शशिकांत नाळे, संजयकुमार दळवी, राहुल होळकर यांनी केले आहे
दरोडेखोरांच्या टोळीचा पुणे पोलिसांकडून पर्दाफाश; तीन राज्यत २१ गुन्ह्यांची नोंद












