पुणे | प्रतिनिधी
पुणे दि.१२ : नृत्याच्या कार्यक्रमासाठी गुजरात येथे गेलेल्या एका तरुणीच्या घरी अज्ञात इसमाने चोरी केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना दि.२६ जून ते ९ जुलै दरम्यान घडली आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस स्थानकात महिलेने फिर्याद दिली आहे.
चोरट्यांनी तेरा लाख दहा हजार रुपये किंमतीचा माल चोरला आहे.सदर तपास पथकातील पोलीस अंमलदार राहुल तांबे, विकास सावंत यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली. सदर आरोपी शुभम अशोक माने (वय २३ रा. मांगडेवाडी,कात्रज) याने चोरी केली असल्याचे तपासात समोर आले आहे. त्याच्या कडून बारा लाख बावीस हजार रुपये जप्त करण्यात आले आहे.
सदर कामगिरी अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, प्रवीण कुमार पाटील, पोलीस उप आयुक्त परी-२ स्मार्तना पाटील, सहा. पोलीस आयुक्त नारायण शिवगावकर यांच्या मार्गदर्शन खाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुमार, पोलीस निरीक्षक विजय पुराणिक, गिरीश दिघावकर, सहा.पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस अंमलदार राहुल तांबे,विक्रांत सावंत, सचिन सरपले, आशिष गायकवाड, शैलेश साठे, चैतन गोरे, निलेश ढमढेरे, मंगेश पवार, हर्षल शिंदे, अभिजित जाधव, अवधातू जमदाडे, धनाजी धोत्रे, साची गाडे, अभिनय चौधरी यांनी केली आहे.












